शेतकरी कामगार पक्षाचा 76 वा वर्धापनदिन पाली येथे युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे प्रमुख उपस्थितीत होणार
शेतकरी कामगार पक्षाचा 76 वा वर्धापनदिन पाली येथे युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे प्रमुख उपस्थितीत होणार
पाली/वाघोशी ( अमित गायकवाड): नव्याने रुजू होत असलेल्या राजकीय संस्कृतीला छेद देत भारतीय शेतकरी कामगार पक्षाने आजही आपला लालबावटा डौलाने फडकत ठेवलेला आहे. 76 वर्ष होतील, एकच पक्ष, एकच रंग आणि महाराष्ट्राचा विकास हे एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ध्येयाने शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते काम करत आहेत याची प्रचिती पुन्हा एकदा पाली येथे होणार्या महामेळाव्यात युवराज संभाजीराजे छत्रपती याच्यां प्रमुख उपस्थितीत येणार आहे.
शेतकरी कामगार पक्षाचा 76 वा वर्धापन दिन सुधागड पाली येथील भक्त निवास पार्किंग मध्ये साजरा होणारआहे. त्या ठिकाणी महाराष्ट्रातून तसेच शहरातून हजारो कार्यकर्ते वर्धापन दिन सोहळ्यासाठी येणार आहेत. असे शेकाप नेते जि.प सदस्य व आरडीसी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेख खैरे यांनी सांगीतले आहे
महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती आपण सर्व पाहत आहात. अशा प्रसंगी शेकापच्या वर्धापन दिनाला 75 वर्षे होत आहेत. या निमित्ताने शेकापचा इतिहास खूप मोठा आहे त्यानुसारच याची ध्येय धोरणे मनाशी बाळगून भविष्यात सुदृढ आणि समृद्ध महाराष्ट्र करू करण्यास आम्ही तयार आहोत शेकापच्या लालबावट्याखाली अजून जोमाने काम करू असे प्रतिपादन शेकापनेते सुरेश खैरे यांनी केले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत