ग्रामपंचायत कार्यालय परळी - सुधागड येथे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
दिनांक: ०१ ऑगस्ट २०२३
राहुल गायकवाड (परळी /सुधागड): बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती परळी ग्रामपंचायत कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करण्यात आले. यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक कार्याचा आलेख उपस्थितांच्या मनोगतातून व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी ग्रामपंचायत कर्मचारी बाळू करले, सचिन गायकवाड, कु. अनिकेत वाघोस्कर यांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत