छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक अपशब्द ; अलिबाग मध्ये वातावरण तापले
(प्रशांत गायकवाड) पाली: अलिबाग येथे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही अल्पवयीन मुस्लिम मुलांनी अपशब्द काढल्याबद्दल अलिबाग मध्ये वातावरण चांगलेच तापले आहे अनेक शिवप्रेमी शिवाजी महाराज चौकात एकवटले असून महाराजांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला आहे हे सर्वजण आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत
शहरातील एका खाजगी क्लास मधील तीन अल्पवयीन मुस्लिम मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढले. याची माहिती शिवप्रेमी पर्यंत पोहोचताच शहरांमध्ये संतापाची लाट उसळली. अलिबाग पोलिसांनी परिस्थिती हाताळताना, संबंधित मुलांना आणि त्यांच्या पालकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले आणि माफी मागायला सांगितले
यानंतरही या वादावर पूर्णपणे पडदा पडला नाही, पोलीस स्टेशन समोर जमलेले शेकडो शिवप्रेमी तरुण तरुणी पुन्हा शिवाजी महाराज चौकात जमले आणि घोषणा देत आहेत, उद्या 31 जुलै अलिबाग बंद झालाच पाहिजे, अशी मागणी हे तरुण करत आहेत, काही शिवप्रेमी उद्या आंदोलन करणारच असल्याचे बोलून दाखवत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत