लिनस क्लब नवी मुंबई च्या वतीने रा.जि. प शाळा उन्हेरे येथे बॅग वाटप
(प्रशांत गायकवाड) पाली: ३०/०७ रा.जि.प. शाळा उन्हेरे येथे लिनस क्लब, नवी मुंबई यांचे तर्फे सन्मा. जागृती पाटील, सन्मा. श्रेया तिवारी, सन्मा. रीमा रावल, सन्मा. मनीषा मंडल आणि सन्मा. विनोद पाटील शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीच्या स्कूल बॅग देण्यासाठी शाळेत आले. सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत व सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आनंददायी पद्धतीने त्यांचे स्वागत केले. पाहुण्यांनी काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले व विद्यार्थ्यांनीही दिलखुलास गप्पा मारल्या. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सुंदर अशा स्कूल बॅग वाटप केले. जागृती पाटील, विनोद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांना शाळा, विद्यार्थी खूप आवडले. या संपूर्ण कार्यक्रमात श्री. उल्हास केदारी सर, श्री. पांडुरंग पारधी सर, यांचे प्रचंड सहकार्य लाभले. यांच्या पुढाकाराने हा स्कूल बॅग वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास अंगणवाडी उन्हेरे च्या श्रीम. सायली पवार, सौ. नम्रता कोळंबेकर उपस्थित राहिले त्यांचे ही सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राम संकाये यांनी केले. मान्यवरांनी भविष्यात ही अजुन भेट देऊ अशी इच्छा व्यक्त केली. शाळेच्या वतीने लिनस क्लब चे आभार मानण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत