HEADLINE

Breaking News

पेण येथील वैद्यकीय निष्काळजी विरोधात ठिय्या आंदोलन



पेण येथील वैद्यकीय निष्काळजी विरोधात ठिय्या आंदोलन

पाली: (प्रशांत गायकवाड ) जिते येथील सारा ठाकूर या १२ वर्षाच्या मुलीचा सर्प दंशाने मृत्यू झाला. तिला प्रथम पेण येथील प्रथमोपचार केंद्र या ठिकाणी आणण्यात आणले होते परंतु तेथील अपुऱ्या उपाय योजनांमुळे तिला एम. जी. एम या ठिकाणी नेत असताना वाटेतच मृत्यू  झाला. वैद्यकीय  सुविधा नसल्यामुळे जसा सारा ला जीव गमवावा लागला असं पुनः घडू नये या साठी जिते गाव, पेण शहर व पेण तालुका यांनी पेण उप जिल्हा रुग्णालया समोर ठिय्या आंदोलन केले या वेळी अनेक संघटनानी त्यांना पाठिंबा दिला. या वेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. शीतल जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजपूत, नायब तहसीलदार कालेकर साहेब, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोल यांच्या उपस्थिती मध्ये आंदोलन कर्त्यांनी निवेदन दिले. आंदोलन कर्त्यांच्या मागण्या नुसार डॉ. शीतल जोशी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ  अंबादास देवमाने यांच्याशी फोन वरून चर्चा  केली असता त्यांनी तातडीने डॉ. शीतल पाटील यांना निलंबनाचे आदेश दिले तसेच अजून कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले. तसेच काही दिवसातच दवाखान्यात सोई सुविधा व औषधांचा साठा करण्यात येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत