HEADLINE

Breaking News

रत्नागिरी येथील कुमारी नीलिमा सुधाकर चव्हाण हिच्या मारेकऱ्यांना कठोर कारवाई व्हावी याकरिता सुधागड तालुका नाभिक समाजाने पाली तहसीलदार साहेबांना दिले निवेदन


पाली (प्रशांत गायकवाड ) नाभिक समाजाची कु.नीलिमा सुधाकर चव्हाण रा. ओमली, ता चिपळूण. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दापोली शाखेमध्ये नोकरीला होती. शनिवार दिनांक 29 जुलै 2023 रोजी म्हणजे ओमली येथे येण्यासाठी निघाली, दापोली बस स्थानकामध्ये चिपळूण कडे जाणाऱ्या एसटीमध्ये ती बसली. मात्र ती चिपळूण ला पोहोचली नाही, शोधा शोध करूनही न सापडल्याने तिच्या नातेवाईकांनी दापोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली परंतु पोलिसांनी ही तक्रार गांभीर्याने घेतली नाही आणि तिचा शोध घेण्यासाठी प्रयत्न देखील केले नाही अखेर दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दाभोळ ता.दापोली येथील खाडीमध्ये तिचा मृतदेह आढळून आला.
 कुमारी नीलिमा सुधाकर चव्हाण हिचा मृतदेह ज्या अवस्थेत मिळाला ते पाहता हा घातपात असावा अशी शक्यता जास्त आहे. कारण तिच्या डोक्यावर सर्व केस आणि दोन्ही भूवया पूर्ण नष्ट करण्यात आल्याची दिसून येत आहे, तिच्यावर अत्याचार करून आणि नंतर तिला अशा प्रकारे विद्रूप करून खाडीमध्ये फेकून देण्यात आले  का? याचाही तपास होणे आवश्यक आहे, तथापि आधीपासूनच नकारात्मक असलेल्या दापोली पोलिसांकडून शोध घेण्यास त्यांना अपयश आले आहे,
 तरी सन्माननीय महोदय आम्ही आपणास कळकळीची विनंती करतो की, आमच्या भगिनीचा घातपाताचा त्यादृष्टीने 12 ऑगस्टपर्यंत तपास व्हावा व श्री सुधाकर चव्हाण व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा अन्यथा आम्ही सर्व रायगड जिल्हा नाभिक तरुण संघ समाज बांधव संपूर्ण ताकदीनिशी 15 ऑगस्ट 2023 रोजी पोलीस अधीक्षक रत्नागिरी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार. तरी महाशय यास विधीत व्हावे ही विनंती, या झालेल्या गृहस्पद प्रकाराचा आम्ही सर्व रायगड जिल्ह्यातर्फे जाहीर निषेध करीत आहोत योग्य तपास न झाल्यास रत्नागिरी रायगड सह संपूर्ण महाराष्ट्रातील सलून व्यवसाय बंद ठेवून आंदोलन छेडण्यात येईल, याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील
 ही गंभीर बाब लक्षात घेऊन या गुन्ह्याचा स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपास करण्याचे आदेश तत्काळ देण्यात यावे व गुन्हेगारांवर कठोर शिक्षा करण्यात यावी  असे निवेदन  सुधागड तालुक्यातील नाभिक समाजाने  पाली तहसीलदार साहेबाना दिले या वेळी
सुधागड नाभिक समाज अध्यक्ष :-रुपेश केशव पवार, उपाध्यक्ष :-दीपक काशिनाथ शिंदे, सेक्रेटरी :-दिनेश गणपत पवार, कार्याध्यक्ष :-अमित गुजर, खजिनदार :-गंगाधर  बापू पांढव उपस्थित होते तसेच रुपाली पांडव, दर्शना शिंदे, समिधा गुजर, नैत्रा पवार, सानिका गुजर, उज्वला गुजर, संध्या गुजर, अश्विनी शिंदे, सोनाली पवार, व सुधागड तालुक्यातील सर्व नाभिक समजतील अनेक पुरुष व महिला उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत