किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल कोरोना काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप
मुबंई-(प्रतीनिधी): किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. बॉडी बॅग (Body Bag) खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे.
मुंबई महापालिकेने कोरोना काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. कोविड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचं अंमलबजावणी संचलनालय (ED) म्हणणं आहे. यात किशोरी पेडणेकर यांचाही सहभाग होता, असं ईडीचं म्हणणं आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच आता किशोरी पेडणेकर यांच्यासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग 2000 रुपयांऐवजी 6800 रुपयांना खरेदी केल्याचं ईडीने (ED) म्हटलं आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप ईडीने म्हटलंय. कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या. ईडीने 21 जून रोजी राज्यभर छापे मारले होते. या छाप्यात 68 लाख 65 हजार रुपये रोकड, 150 कोटींची स्थावर मालमत्ता सील करण्यात आली होती. या शिवाय 15 कोटींची एफडी आणि इतर गुंतवणूकही ईडीला आढळली होती. 21 जूनला ईडीने मारलेल्या छापात्यात उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, सुजीत पाटकरसह 10 ते 15 जणांचा समावेश होता.
किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार : किरीट सोमय्या
दरम्यान किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार, असं किरीट सोमय्या म्हणाले. "माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात बॉडी बॅग्ज खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. 1500 रुपयांची मृतदेह ठेवण्याची बॉडी बॅग 6700 रुपयांनी घेतली. मुंबईच्या महापौर, अतिरिक्त आयुक्त आणि वेदांत इनोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही या संबंधिची तक्रार मुंबई पोलिसात केली होती. आणखी तीन घोटाळ्यांचा तपास सुरु आहे. यावरही कारवाई होणार आहे. आधी संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर जेलमध्ये गेले होते, आता किशोरी पेडणेकर आणि नंतर आणखी तीन नेते जेलमध्ये जाणार, अशी किरीट सोमय्या म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत