संभाजी भिडे यांना रायगड बंदी करावी वंचित आघाडीचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन
पाली/ वाघोशी (अमित गायकवाड) महापुरुषांचा अवमान करणारे संभाजी भिडे कार्यक्रम पेन येथे दिनांक 6 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रम झाल्यास जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. याकरिता रायगड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष प्रदीप ओव्हाळ व युवा अध्यक्ष अमित गायकवाड यांनी निवेदनामध्ये नमूद केले की संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले तसेच अनेक हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीचे साईबाबा यांच्याबाबत बेताल वक्तव्य केल्याने रायगड जिल्ह्यात संतप्त वातावरण आहे. यामुळे संभाजी भिडे यांचा दिनांक 6 रोजी पेन मध्ये होणारा कार्यक्रम रद्द करण्यात यावा अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल असे यावेळेस निवेदन देताना म्हटले तसेच संभाजी भिडे यांना रायगड बंदी करण्यात यावी देखील पुढ म्हणाले यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रदीप ओव्हाळ, महासचिव वैभव केदारी, जिल्हा युवा अध्यक्ष अमित गायकवाड, प्रदीप कांबळे, चंद्रकांत साळुंखे, सुधागड तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड, महासचिव आनंद जाधव, खोपोली शहर अध्यक्ष दिपक गायकवाड, कर्जत तालुकाध्यक्ष धर्मेंद्र मोरे, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण भालेराव, खालापूर तालुकाध्यक्ष युवक प्रशांत गायकवाड पेण तालुका युवा अध्यक्ष संजय गायकवाड, अलिबाग तालुकाध्यक्ष घरत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत