प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी संपवले जीवन; कर्जतमधील एनडी स्टूडीओतच…
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी जीवन संपवले आहे. त्यांनी कर्जतच्या एन डी स्टुडिओमध्ये ही घटना केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. १९४२ अ लव्ह स्टोरी या सिनेमापासून सुरुवात, त्यानंतर हम दिल दे चुके सनम, देवदास, लगान, जोधा अकबर, प्रेम रतन धन पायो यासारख्या सिनेमांचं कला दिग्दर्शन त्यांनी केलं.
त्यांच्या निधनाने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रायगडमधील कर्जत येथील एन. डी. स्टुडिओत त्यांनी आपले जीवन संपवले असल्याचे समजते.
तिथे ते मृतावस्थेत सापडले आहेत. ९० च्या दशकांमध्ये बहुचर्चित तमस या दुरदर्शनवरील आपल्या कारकिर्दिला प्रारंभ केला होता. नंतर लव्ह स्टोरी या चित्रपटाने त्यांनी स्वतंत्रपणे बॉलिवूडमध्ये काम करण्यास प्रारंभ केला.
यानंतर बॉलिवूडमध्ये सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून त्यांची अल्पावधीत ओळख निर्माण केली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दित लगान, जोधा-अकबर, देवदास, प्रेम रतन धन पायो आदी चित्रपटाच्या लोकप्रियतेत नितीन देसाई यांच्या कला दिग्दर्शनचा मोठा वाटा होता.
अनेक हिंदी चित्रपट आणि अनेक मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य सेट उभारणारे कलादिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती होती. वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे.
त्यांनी चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवला आहे. तर तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला आहे.
.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत