पत्रकार गौसखान पठाण यांना जिवे ठार मारण्याची धमकी
पाली :- दैनिक रायगड न्यूजचे मुख्य संपादक गौस खान पठाण यांना आज एका गावगुंडाने धमकी दिल्याची घटना घडली. दरम्यान, या प्रकरणी पत्रकार गौस खान पठाण पाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत संबधितांवर गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना पोलिस अधिकारी यांनी फक्त ‘एनसी’ दाखल करून घेत पत्रकार संरक्षण कायद्याला हरताळ फासली. दरम्यान, संबधितांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल न झाल्यास सुधागडातील पत्रकारांसह ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही राष्ट्रीय पत्रकार संघटना राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय महासचिव खलील सुर्वे यांनी दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार दैनिक रायगड न्यूजचे मुख्य संपादक गौस खान पठाण आज भाजी मार्केटमधून भाजी घेवून जात असताना स्वागत (मापारा) बारच्या समोर आले असता एक खासगी बस थांबली होती. ‘त्या’ बसचा चालक (नाव माहित नाही) प्रकाश बेलोसे यांच्या मुलाला बसमधून उतरवित होता. फि भरली नाही, अशा वादातून ‘त्या’ मुलाला बसमधून उतरवित होता, असे पत्रकार पठाण यांना समजले. पठाण यांनी पुढाकार घेवून ‘त्या’ मुलाला बसमधून उतरवू नको, असे सांगितले. तर बस चालक पत्रकार पठाण यांना म्हणाला की, “तुम्हाला विषय माहित नाही, तुम्ही मधे पडू नका”, यानंतर बस चालक बस घेवून निघून गेला. यानंतर दहा मिनिटांनी बसचा मालक याने दैनिक रायगड न्यूजचे मुख्य संपादक गौस खान पठाण यांच्या मो. नं. 9273174555 वर राठोड (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी 8623082085 या क्रमांकावरून फोन करून शिवीगाळ करुन, तुला बघून घेतो अशी धमकी दिली तसेच तुम्ही पत्रकार पैसे घेवून बातम्या लावता, तूला जास्त माज आला आहे, अशी धमकी दिली.
रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारसे यांचा अशाच प्रकारे खून करण्यात आला आहे. तसेच जळगांव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदिप महाजन यांना देखील मारहाण करण्यात आली आहे. राज्यात पत्रकारांसोबत अशा घडत असताना पाली पोलीस यांच्याकडून संपादक गौस खान पठाण यांना धमकी देणाऱ्याविरोधात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणे आवश्यक असताना पोलिस प्रशासनाकडून फक्त एनसी (अदखलपात्र गुन्हा) नोंदवून घेण्यात आली आहे. आज, दि. 26 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजून 51 मिनिटांनी भारतीय दंड सहिता 1860 नुसार कलम 507 प्रमाणे गुन्हा नोंदवून घेण्यात आला. जर दैनिक रायगड न्यूजचे मुख्य संपादक गौस खान बरकत पठाण यांना व त्यांच्या कुटुंबियांना आरोपीकडून इजा पोहचविण्यात आली तर याची जबाबदारी कुणाची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, संबधितांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल न झाल्यास सुधागडातील पत्रकारांसह ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही राष्ट्रीय पत्रकार संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय महासचिव खलील सुर्वे यांनी दिला आहे.
तर व्हॉईस ऑफ मीडिया आंदोलन छेडेल :-
रायगड पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे व रायगड जिल्हाधिकारी डॉं. योगेश म्हसे यांनी याप्रकरणी जातीने लक्ष देवून संबंधित आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, तसेच दैनिक रायगड न्यूजचे मुख्य संपादक गौस खान पठाण यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, अन्यथा सुधागड तालुक्यातील पत्रकारांसह ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही राष्ट्रीय पत्रकार संघटना राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी यांनी दिला आहे.
या प्रकरणी राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी यांनी महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिति तटकरे, कोकण विभागीय आयुक्त डॉं. महेंद्र कल्याणकर, रायगड जिल्हाधिकारी डॉं. योगेश म्हसे, रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ, रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांना सदर प्रकरणात लक्ष देण्याची मागणी केली आहे. तरीही पाली पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल न केल्यास ‘व्हाॅईस ऑफ मिडीया’ राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी व राष्ट्रीय महासचिव खलील सुर्वे यांनी दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत