पक्षाचा व्हीप झुगारल्याने चार, तर तिसरे अपत्य असल्याने एक नगरसेवक अपात्र ; पाली नगरपंचायत मध्ये उलथापालथ
पक्षाचा व्हीप झुगारल्याने चार तर तिसरे अपत्य असल्याने एक नगरसेवक अपात्र
पाली (प्रशांत गायकवाड ): सुधागड पाली या ठिकाणी स्थापन झालेल्या पाली नगरपंचायत मध्ये अनेक राजकीय उलाढाली घडत आहेत. नगर पंचायतीला ग्रहण लागले आहे का असा लोकांचा सूर येत आहे, रायगड जिल्हाधिकारी डॉ.योगेश मसे यांनी पाली नगराध्यक्षा आणि चार नगरसेवक यांना अपात्र ठरवले आहे,
करा अध्यक्ष निवडणुकीमध्ये पक्षाचा विप झुगारल्याने शेकापाच्या नगराध्यक्षा प्रणाली शेळके, विनायक जाधव,शिवसेनेच्या नगरसेविका कल्याणी दबके, प्रतीक्षा पालांडे,या चार जणांना अपात्र ठरवण्यात आले,तसेच शिवसेनेचे नगरसेवक सचिन जवकेयांना तिसरे अपत्य असल्या कारणाने अपात्र ठरवले आहेत,
जानेवारी 2022 मध्ये पाली नगरपंचायतीची निवडणूक झाली, 2022 ला गीता ताई पार्लेच्या यांना पहिल्या नागराध्यक्षा होण्याचा मान मिळाला, त्यांनी राजीनामा दिल्यामुळे पद रिक्त झाले होते, रिक्त नगराध्यक्षांची निवडणूक विशेष सभेच्या आयोजनातून 14 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आली. यावेळी शेकापच्या प्रणाली शिर्के यांनी बंडखोर करून पक्षाचा व्हीप जुगारून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. शेकपाचे अरिफ मणियार यांना हरवून त्या नगराध्यक्ष बनल्या. नगराध्यक्ष निवडणुकीत पक्षाचे विप झुगारून दोन शेकापचे व दोन शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रणाली शिर्के यांना मतदान केले.
याप्रकरणी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी या चार नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई केली दरम्यानच्या काळात कल्यानी दपके यांनी सचिन जवके यांना 3 अपत्य असून निवडणूक लढवली संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती, त्या संदर्भात चौकशी आणि सुनावणी करून त्यांना देखील अपात्र ठरवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत