महाड मध्ये ए. टी. एम. फोडताना चोरट्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
महाड (वार्ताहर): दि. १३ : रायगड जिल्ह्यात चोरट्यांनी अगदी उच्छाद मांडला आहे. जबरी चोऱ्या आणि भुरट्या चोऱ्या यांच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. चोरट्यांनी आता आपला मोर्चा बँकांचे ए टी एम मशीन फोडण्याकडे वळविला आहे. अशाचप्रकारे दि. १२ आगस्टच्या रात्री २:३० ते २:४५ वाजण्याच्या दरम्यान महाड तालुक्यातील बिरवाडी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ए टी एम मशीन फोडणाऱ्या दोन अज्ञात चोरट्यांना बिरवाडी एम आय डी सी पोलिसांनी शिताफीने आणि सिने स्टाईलने पकडून जेरबंद केले आहे. या पोलीस कारवाईमध्ये महाड पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एम आय डी सी पोलीस कॉन्स्टेबल ए एम सुरनर, पो हवालदार आर के गोरेगावकर, सी अंबरगे यांनी कार्यवाही बजावली. व मोठया शिताफीने ए टी एम मशीन फोडणाऱ्या दोन चोरट्यांना पोलीसांनी सिने स्टाईल ने अटक केली आहे. या घटनेचे सी सी टीव्ही फुटेज व व्हिडीओ पोलीस प्रवाह न्यूजच्या हाती आले आहेत. सकाळी उशिरापर्यंत या प्रकरणाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया एम आयडीसी पोलीस ठाण्यात सुरू होती.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत