साजगाव - आडोशी रस्त्याची दुरावस्था ; रस्ता तातडीने दुरुस्त करा सा. बा. विभागाकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार
दि. ३१ जुलै २०२३
खालापूर (राहुल गायकवाड ):
साजगाव ते अडोशी या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. या बाबतीत वंचित बहुजन आघाडीचे खालापूर तालुका अध्यक्ष मा. प्रवीणजी भालेराव साहेब आणि युवक अध्यक्ष प्रशांत गायकवाड आणि संपूर्ण खालापूर पदाधिकाऱ्यांच्या वतीने सा. बा. वि. उपविभागीय अधिकारी यांना मागणी निवेदन सादर करण्यात आले.
सदर रस्ता हा काँक्रिटचा असून तो पाच वर्ष झाली तयार करण्यात आला होता, त्याचा DLP कालावधी पूर्ण होण्याअगोदर खड्डे भरण्यात आले होते. पावासात खड्डे पडले. आणि हे खड्डे बुजाविण्यासाठी अंदाजे २६ लाख रु. अंदाजे रक्कम या रोडवर खर्च करण्यात आला होता. इतका खर्च करून सुद्धा या पावसाळ्यात हा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला असून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. हा रस्ता पूर्णपणे निकृष्ट असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शालेय विध्यार्थी, कामगार, वाहन चालक, दुचाकी स्वार यांना प्रवासा दरम्यान प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. औद्यागिक क्षेत्र असल्यामुळे साजगाव ते अडोशी या रस्त्याला रहदारी फार मोठया प्रमाणात असते. या औद्योगिक क्षेत्रात लहान मोठे 100 कंपन्या आणि व्यवसायिक आस्थापणे आहेत. त्यामुळे मोठे मोठे ट्रेलर, अवजड वाहने यांची रेलचेल रोजची आहे.
साजगाव ते अडोशी हा मुख्य आणि एकमेव रस्ता असल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्याचा प्रवास महागात पडत आहे. अनेकांना पाठीच्या, मनक्याच्या, आजाराना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि चीड निर्माण झाली असून हा रस्ता आमचे जीव घेणार कि काय? असा प्रश्न त्यांना पडला आहे.
येत्या काही दिवसात जर खड्डे भरण्यात आले नाही तर वंचित बहुजन आघाडी चे खालापूर अध्यक्ष मा. प्रविणजी भालेराव आणि कमिटी तीव्र आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत