माजी नगराध्यक्षा गीता पालरेचा यांच्यासह अनेक कार्यकर्ते घरवापसीच्या तयारीत. सुधागड भाजपाला खिंडार ?
माजी नगराध्यक्षा गीता पालरेचा यांच्यासह अनेक कार्यकर्ते घरवापसीच्या तयारीत. सुधागड भाजपाला खिंडार ?
पाली/ ( अमित गायकवाड) सुधागड तालुक्यात भारतीय जनता पार्टीला मोठा हादरा बसणार असून येणाऱ्या काळात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय पक्षांची संगीत खुर्ची सुरू असून यामध्ये शिवसेनेचे दोन भाग झाले आहेत. राष्ट्रवादीचे देखील दोन भाग झालेले आहेत. अजितदादा यांच्या समवेत सोबत जात सुनील तटकरे यांनी सत्तेची वाट धरली आहे. यामुळे सत्तेच्या मोहापोटी आणि अनेक तडजोडी करण्याकरिता राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले महाधुरंदर पुढारी व कार्यकर्ते लवकरच सुनील तटकरे यांच्या समवेत राष्ट्रवादीत येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांची कन्या गीता पालरेच्या यांनी पाली नगरपंचायतीच्या झालेल्या अटीतटीच्या लढाईत राष्ट्रवादीचे अनेक सदस्य निवडून आणून स्वतः पाली नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष म्हणून बसल्या होत्या मात्र काही कारणास्तव त्यांनी थोड्या अवधीतच नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना घेऊन प्रवेश केला होता. सुधागड तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा समजल्या जाणाऱ्या गीता पालरेचा यांनी प्रवेश केल्याने भारतीय जनता पार्टीमध्ये नेतृत्वावरून कुजबूज सुरू होती. मात्र गीता पालरेचा यांच्या प्रवेशाने विशेष फरक पडला नसून त्यांच्या हाती पक्षाची कुठल्याही प्रकारची धुरा न आल्याने कार्यकर्त्यांना हवा तसा मान सन्मान न मिळाल्याने भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांची घुस्मत घुसमट होत असलेली ची बातमी सूत्रांनी दिलेली आहे. यामुळेच गीता पालरेचा आल्याच्या यांच्या समवेत गेलेले सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी पुन्हा सुनील तटकरे यांच्या बरोबरीने राष्ट्रवादीमध्ये जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत