पेण शहरात जातीय वाचक शिवीगाळ प्रकरणी खान कुटूबियांवर ‘ॲट्रॉसिटी’ गुन्हा दाखल ! बाप, लेक-दोन्ही फरार
|पेण| |प्रशांत गायकवाड|
पेण : (प्रशांत गायकवाड): चर्मकार समाजातील महिलांना जातीय वाचक शिवीगाळ करणाऱ्या शब्बीर अब्दुल खान व कुटुंबीयान विरोधात पेण पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्याची खबर समजताच शब्बीर खान व कुटुंबीयांनी पलायन केले आहे. सिटी सर्वे नंबर 1652 ही चर्मकार समाजाची जागा असून या जागेत अब्दुल खान हे त्यांची अनेक वाहने चर्मकार समाजाच्या मालकीच्या दीड गुंठा मोकळ्या जागेत मनमानी करून लावतात. मरीआई महिला मंडळाचा या जागेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंडळाच्या अध्यक्षा रश्मी राजेंद्र गायकवाड यांनी व इतर महिलांनी कार्यक्रम असल्याने अब्दुल खान यांना सदरच्या जागेतून आपली वाहने काढून घेण्यास सांगितले. परंतु यावेळी अब्दुल खान, शब्बीर खान, मिर्झा खान यांनी गाड्या हलवणार नाही असा पवित्रा घेत भांडणाला सुरुवात केली. तसेच यावेळी चर्मकार समाजाच्या महिलांना जातीय वाचक शिवीगाळ करून अपमानित करण्यात आले अशी तक्रार मरीआई महिला मंडळाचे अध्यक्ष रश्मी गायकवाड यांनी पेण पोलीस ठाण्यात केली. पेणचे उप विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलिसांनी तपास करून शब्बीर खान, मिर्झा खान,अब्दुल खान यांच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळतच शब्बीर खान, मिर्झा खान व कुटुंबीयांनी पलायन केले आहे. फरार आरोपींचा पेण पोलीस शोध घेत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत