HEADLINE

Breaking News

खोपोली बाजारपेठेत चोरी करणाऱ्या दोन महिला जेरबंद



खोपोली ( हनुमंत मोरे) : दिनांक ३१ऑगस्ट २०२३ रोजी अपर्णा संदीप पाटील व शीतल नितीन चांदोरकर अशा ०२ महिला खोपोली बाजारपेठेमध्ये वेगवेगळया ठिकाणी रस्त्यावर सामान विक्री करीत होत्या बाजारपेठेतील गर्दीचा फायदा घेऊन दोन अनोळखी महिलांनी विक्री करीत असलेल्या महिलांच्या पर्समधील पैसे लंपास केल्याचे लक्षात आले.याबाबत अपर्णा संदीप पाटील व शीतल नितीन चांदोरकर यांनी रितसर तक्रार खोपोली पोलिस ठाण्यात दाखल केली असता खोपोली पोलिसांनी सापळा रचून चोरी करणाऱ्या दोन महिलांना पकडले.
अपर्णा संदीप पाटील व शीतल नितीन चांदोरकर या दोन महिलांकडून अनुक्रमे ३,८००/- रुपये व ४०००/- असे एकूण ७,८००/- रुपये रोख रक्कम, मुळ आधारकार्ड, बँकांचे एटीएम कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्रे असा मुद्देमाल चोरुन नेला होता. सदर बाबत अपर्णा संदीप पाटील व शीतल नितीन चांदोरकर या महिलांनी खोपोली पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. घडलेल्या गुन्हयाची माहिती मिळताच खोपोली पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदार मपोना/05 पी.एस.कांबळे, बिट मार्शल्स पोशि/520 अमोल राठोड व पोशि/393 राजेश चौहान यांनी श्री.शितल राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खोपोली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरीत तपास करुन वेगवान हालचाली केल्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणा-या ०२ महिला आरोपी १)पुनम जितेश सकट व २) सुनिता अशोक राखपसरे, दोन्ही रा.घुले वस्ती, महादेव नगर, मांजरी, जि.पुणे यांना रंगेहाथ पकडण्यात खोपोली पोलीसांना यश आले आहे.
सदर गुन्ह्या बाबत दोन्ही आरोपी महिलांविरुध्द खोपोली पोलीस ठाणे कॉ.गु.र.नं.277/2023, भा.द.वि.सं.क.379,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास मपोहवा/152 दिव्या देशमुख या करित आहेत. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी सोमनाथ घार्गे(पोलीस अधीक्षक) रायगड, अतुल झेंडे(अपर पोलीस अधीक्षक,रायगड) व विक्रम कदम(उप विभागीय पोलीस अधिकारी, खालापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शितल राऊत(खोपोली पोलीस ठाणे), मपोना/05 पी.एस.कांबळे, पोशी/अमोल राठोड,पोशी/राजेश चौहान यांनी केलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत