वंचित बहुजन आघाडीच्या बहिणीनी पोलीस भावांना राखी बांधून केला सण साजरा
|पेण| |संजय गायकवाड|
पेण : मंगळवार दिनांक 29 8 23 रोजी पेण पोलीस ठाणे येथे संध्याकाळी 8:00 वाजता सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा रक्षाबंधन कार्यक्रम आनंदात पार पडला. सदैव आपल्या 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्याचे काटेकोर पालन करून चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि गुन्हेगारांना जरब बसवणारे काम करण्या सोबतच समाजात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत देशासाठी काम करणारे, कायद्याचे रक्षण आणि संविधानाचे पालन करायची समज आणि दिशा सातत्याने समाजाला देणारे, पोलिस खात्यात काम करणारे पेण पोलीस ठाणे येथील आपले भाऊ सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे वंचित बहुजन आघाडी पेण तालुक्याचे अध्यक्ष देवेंद्र मारुती कोळी व महासचिव सुनील प्रल्हाद धामणकर यांच्या नेतृत्वाने पेण तालुक्यातिल वंचित बहुजन आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांकडून रक्षासूत्र (राखी) बांधून या आपल्या पोलिस भावांना ओवाळून त्यांच्या रक्षणाची, त्यांना व त्यांच्या कुटूंबाला सुखी समाधानी ठेवण्यासाठी परमेश्वराकड़े प्रार्थना करून त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी ईश्वराकडे प्रार्थना केली. सदरच्या आनंदमय सण साजरा करण्यासाठी पनवेल तालुका अध्यक्ष पुष्पांजली सकपाळ सोबत प्रगती देवेंद्र कोळी, ऋतुजा वाघमारे, प्रभावती कोळी, दीपाली कांबळे, सुनीता कोळी, सुप्रिया धामणकर आदिंसह महिला कार्यकारिणी तसेच नियोजक वंचित बहुजन आघाडी पेण तालूका अध्यक्ष देवेंद्र मारुती कोळी, महासचिव सुनील प्रल्हाद धामणकर, सचिव रामदास बळवंत वाघमारे, सदस्य तुषार कोळी, प्रल्हाद कांबळे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत