HEADLINE

Breaking News

उरण येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास जन्मठेप



पनवेल: - दि. २९.१०.२०१८ रोजी डाउरनगर उरण येथील तेरा वर्षीय अल्पवयीन पिडीतेस शाळेत जात असताना शेजारी राहणारा आरोपी रमेश दादा कालेल याने आवाज देवून त्याचे राहत्या घरात बोलवून तिला जीवे ठार मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने बलात्कार करणा-या आरोपी रमेश दादा कालेल याचे विरूध्द तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून उरण पोलीस ठाण येथे गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सदर गुन्हा हा सत्र न्यायालयात दाखल केला असता त्यावर सुनावणी अंती पनवेल येथील सत्र न्यायालयात आरोपी यास भा. दं. वि. कलम ३६३, ३४२, ३७६ (२) (आय) (एन), ५०६ व पोक्सो कलम कायदा ५ (एल), ६ खाली दोषी धरून उर्वरित सर्व आयुष्याकरिता जन्मठेप व ५० हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी की, या खटल्यातील आरोपी रमेश दादा कालेल, वय - २२ वर्षे, याने २९/१०/२०१८ रोजी अल्पवयीन पिडीता शाळेत जात असताना शेजारी राहणा-या आरोपीने तिला आवाज देवून त्याचे राहते घरात बोलावून घेतले व दरवाजा आतून बंद करून पिडीतेला जिवे ठार मारण्याची धमकी देवून तीनवेळा जबरदस्तीने शरीरसंबंध केले व तिला दि. ३०/१०/२०१८ रोजीच्या पहाटेपर्यंत घरात डांबून ठेवले. अल्पवयीन पिडीतेने ओरडण्याचा प्रयत्न केला असता तिचे तोंड दाबून ठेवले. अल्पवयीन पिडीतेला दुस-या दिवशी पहाटे आरोपीने घरामधुन सोडले व झालेला प्रकार घरी सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. पिडीता पहाटे घरी आल्यानंतर तिने आईला सदर प्रकाराबाबत सांगितले. त्यानंतर पिडीतेच्या आईने अल्पवयीन पिडीतेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीविरूध्द भा. दं. वि. कलम ३६३, ३४२, ३७६ (२) (आय) (एन), ५०६ व पोक्सो कलम कायदा ४, ६, ८, १२ अन्वये उरण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला. उरण पोलीस ठाणे यांनी सदरच्या गुन्हयाचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले. सदरच्या खटल्याची सुनावणी मा. सहा. अति सत्र न्यायाधीश शाइदा शेख सो. यांचे न्यायालयात झाली. प्रतिक्षा वडे - या प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता, अँड. वारंगे यांनी एकुण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. सदर केसमध्ये पिडीत मुलीची आई, पिडीत मुलगी तसेच वैद्यकीय अधिकारी आणि तपासिक अंमलदार यांची साक्ष मुलीची आई, पिडीत मुलगी तसेच वैद्यकीय अधिकारी आणि तपासिक अंमलदार यांची साक्ष महत्वाची ठरली.. तपासिक अंमलदार श्री. के. एन. शिरोळे, पोलीस उपनिरीक्षक, उरण पोलीस ठाणे व श्रीमती रूपाली चौधरी, पोलीस उपनिरीक्षक, उरण पोलीस ठाणे यांचा तपास महत्त्वाचा ठरला तसेच पैरवी पो.शि./ ३५४३ श्री. गायकर व पो.शि./ १२४०९ श्री. राजेंद्र बर्गे यांचे मोलाचे सहकार्य प्राप्त झाले. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता, अँड. प्रतिक्षा वडे वारंगे यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद आणि दाखल केलेले न्यायनिर्णय ग्राह्य धरून मा. सहा अति सत्र न्यायाधीश शाइदा शेख सो. यांनी दि. २९.०८.२०२३ रोजी आरोपी रमेश दादा कालेल यास भा. द. वि. कलम ३६३, ३४२,३७६ (२) (आय) (एन), ५०६ व पोक्सो कलम कायदा ५(एल), ६ खाली दोषी धरून जन्मठेप व ५० हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
 --
या घटनेच्या निर्णयामुळे यापुढे जो अल्पवयीन मुलींवर अतिप्रसंग करेल अशांना न्यायालय जन्मठेपेची शिक्षा देईल असा संदेश संपूर्ण जनतेस गेलेला आहे व या न्यायनिर्णयाचे स्वागत स्थानिक नागरिक करित आहेत.
-
विशेष सरकारी अभियोक्ता, 
ॲड. प्रतिक्षा वडे वारंगे, मो. क्र.
९८५०५२०५५५


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत