HEADLINE

Breaking News

रोह्यात अनैतिक व्यापारानां आलय उधाण, पोलीसांनी केली हि कारवाई



रोहा | |प्रतिनिधी| 

रोहा दमखाडी येथील लॉजवर तिन महिलाना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या एका दलालाला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर या महिलांची सुटका केली आहे. याआधी जादुटोणा प्रकरण, गुटखा कारवाई अशा घटना लागोपाठ उघडकीस आल्या आहेत, त्यामुळे रोह्यात चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रोहयात अवैध धंद्यांचे नेटवर्क चालविणाऱ्या मुळमालकांवर कारवाई होऊन गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी रोहेकरांची मागणी आहे. रोहयात सुरू असलेल्या अवैध, अनैतिक धंद्यांविरोधात गेले काही दिवस नागरिकांतून ओरड सुरू आहे. पंधरा दिवसांपूर्वी याविषयावर रोहयात सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्षांची एकत्रित बैठकही झाली होती, त्यामध्ये नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थिती लावून अवैध धंद्यांविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. गुरुवारी रोहयातिल शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याविषयात लक्ष घालण्याची मागणी केली होती. याची दखल घेत पोलिसांचे शुक्रवारी रोहयात धाडसत्र सुरु होते, रात्री उशिरा शहरातील दमखाडी येथिल श्रीराम लॉजवर ही कारवाई करण्यात आली. या लॉजवर पीडित महिलांना गिर्हाईक पुरवून देह व्यापार सुरू होता. याकारवाईत 3 महिलांची सुटका करून संजय वाघमारे विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलमांन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमो हे करीत आहेत. रोहयातिल अवैध धंद्यांविरोधातील ही कारवाई लुटुपुटीची नसावी, येथे रोजंदारीवर कामावर ठेवलेल्या छोट्यामोठ्या गरजू तरुणांवर ही कारवाईचे सोपस्कर नसावेत. तर मूळ मालकांवर गुन्हे दाखल होऊन कारवाई व्हावी अशी मागणी रोहा प्रेस क्लबने केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत