HEADLINE

Breaking News

रायगड जिल्हा कार्यक्षेत्रातील जड- अवजड वाहतूकबंदी अधिसूचना जारी




रायगड (अलिबाग)दि.1-- रायगड जिल्हा कार्यक्षेत्रातील पोलादपूर, महाड, माणगाव मार्गे पनवेलकडे येणारी मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वरील जड- अवजड वाहनांची वाहतूक ही वाकण फाटा, पाली-खोपोली फाटा मार्गे मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गे व एन. एच. ०४ ( पनवेल-खोपोली जुना महामार्ग) या मार्गावरुन वळविण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी जारी केले आहेत. हे आदेश दि.28 सप्टेंबर पर्यंत लागू राहणार आहेत.

सद्य:स्थितीत जिल्ह्यात सुरु असलेली पर्जन्यवृष्टी, मुंबई-गोवा महामार्गावरील दुरुस्तीचे कामकाज व पुढील महिन्यात साजरा होणारा गणेशोत्सव यामुळे सदर महामार्गाचे दुरुस्तीचे काम होणे आवश्यक आहे. सदर महामार्गावरील पोलादपूर महाड, माणगांव मार्गे पनवेलकडे होणारी जड- अवजड वाहनांची वाहतूक बंद करुन, सदर जड अवजड वाहनांची वाहतूक वाकण फाटा, पाली- खोपोली फाटा मार्गे मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गे किंवा एन. एच. ०४ (पनवेल-खोपोली जुना महामार्ग) मार्गे वळविणे आवश्यक असल्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक रायगड यांनी दिलेला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांची खात्री झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ म्हसे यांनी हे आदेश जारी केले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत