जालना येथे मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीमारीचा खालापूर तालुक्यात पडसाद, छावा क्रांतिवीर सामाजिक संस्थेच्या वतीने घटनेच्या निषेधार्थ खालापूर तहसीलदारांना निवेदन
|खालापूर| |महेंद्र ओव्हाळ|
खालापूर: मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलना दरम्यान लाठीमाराची घटना घडली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु केलं होतं. चार दिवसांपासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु होतं. आरक्षण जाहीर करावं, अशी त्यांची मागणी होती. या आंदोलनात अनेक गावकरी आणि संघटना सहभागी झाले होते. पण पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारीच्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. संविधानिक पद्धतीने आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर केलेल्या लाठिमारीच्या निषेधार्थ छावा क्रांतिवीर सामाजिक संस्थेच्या वतीने खालापूर तहसिलदार यांना छावा क्रांतिवीर सामाजिक संस्थेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष नरेश देशमुख, रायगड जिल्हा कामगार अध्यक्ष हनुमंत भोईर, रायगड जिल्हा सचिव दीपक संसारे, रायगड जिल्हा खजिनदार संजय पवार, रायगड जिल्हा सल्लागार दिलीप साळवी, खालापूर तालुका अध्यक्ष भानुदास जांभळे, पनवेल तालुका अध्यक्ष अशोक साहेब, पेण तालुका अध्यक्ष निलेश जाधव, पनवेल पूर्ण कोन विभाग अध्यक्ष अनंत कोंडुलकर साहेब, वाघ साहेब, विशाल देशमुख रायगड कार्याध्यक्ष अंकुश जाधव, अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत