अपघात रोखण्यासाठी जांभूळपाडा येथे गतिरोधक बसवा, ग्रामस्थांची मागणी.
पाली [अमित गायकवाड] पाली खोपोली महामार्ग हा सुस्थितीत असल्याने या रस्त्याने रहदारी वाढलेली आहे.पाली खोपोली मार्गावर जांभूळपाडा या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात आला आहे. या पुलामुळे येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्या या जांभूळपाडा येथून बाहेर पडताना दिसत नाही.
यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याने या ठिकाणी पुलाच्या दोन्ही बाजूस गतिरोधक बसवावे. असे जांभूळपाडा येथील रहिवासी चंद्रकांत शिर्के यांनी ग्रामस्थांच्या वतीने सांगितले. ते पुढे म्हणाले की या मार्गावरून वाहने अति वेगाने पळत असतात. रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सावधानता म्हणून किमान येथे दोन्ही बाजूस गतिरोधक बसविणे आवश्यक असल्याने एमएसआरडीसीने ते लवकरात लवकर बसवावे. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने जन आंदोलन छेडले जाईल.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत