मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सव कालावधी साठी जनसुविधा केंद्र सुरू केली जाणार-- सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

रायगड दि. 12:--- मुंबई -गोवा महामार्गावरून एक लेन वाहतुकीसाठी उपलब्ध होत असून गणेशोत्सव कालावधीसाठी महामार्गावर जनसुविधा केंद्र सुरू केली जाणार आहेत, ज्यामुळे प्रवासी व वाहनधारकांना मदत मिळेल व प्रवास चांगला होईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. यावेळी ओव्हर टेक टाळून प्रवासात कोंडी न होण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबई ते गोवा या महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर या भागातील कामाची पाहणी केली. त्यांच्या हस्ते कशेडी टनेलचे लोकार्पण करण्यात आले.
कासू ते इंदापूर या टप्प्यातील कामांची पाहणी केली. पनवेल कासू या पहिल्या 42 किलोमीटर एक लेन पूर्ण झाली असून पैकीकाही किरकोळ स्पॉट वगळता इतर वाहतुकीसाठी योग्य आहे . दूसरा टप्प्याातील कासू ते इंदापूर मधील कामे वेगाने केली जात आहेत. यामध्ये सीबीटी तंत्राचा वापर करून कामे केली जात आहेत. अवजड वाहनांना वाहतूक बंदीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग वरील कासू पासून पुढील कामाची गती वाढविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना आदेश दिले असून तीन ते चार दिवसात राहिलेली कामे पूर्ण केली जातील असे यावेळी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी बोलताना सांगितले.
गणेश भक्तांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी महामार्गावर गणेशोत्सव कालावधी साठी सुविधा केंद्र सुरू केली जात आहे .खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापुर ,माणगाव , लोणेरे, महाड, महाड एम.आय.डी.सी.,पोलादपुर या ठिकाणी जनसुविधा केंद्रावर पोलीस मदत केंन्द्र, वैदयकिय उपचार सुविधा, बालक आहार कक्ष व मोफत चहा, बिस्कीट, सरबत, पाणी आणि महिलांसाठी फिडींग कक्ष उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
कशेडी टनेलचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण
दोन किलो मीटर कशेडी बोगद्यामुळे प्रवासातील इंधन व वेळेत होणार बचत
महामार्गावरील पोलादपूर ते खेड दरम्यान कशेेडी घाटातील दोन किलोमीटर बोगद्याचे काम पूर्ण झाले असून त्याचे आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यामुळे प्रवासातील इंधन व वेळेत होणार बचत होणार असल्याने याचा फायदा वाहनधारकांना होईल. एकूण 17 किलोमीटर अवघड अंतर या दोन किलोमीटर टनेल मुळे सोपे व कमी झाले आहे. तसेच घाटातील प्रवासाची 45 मिनिटे वाचेल. यावेळी बोगद्याच्या प्रवेश मार्गाच्या बाजूस मंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पाहाणी दौर्यात त्याचे समवेत माजी आमदार धैर्यशील पाटील, एनएचएआयचे मुख्य अभियंता संतोष शेलार, कार्यकारी अभियंता निरज चवरे व विविध विभागांचे अधिकारी यासह बिपीन म्हामुनकर, निलेश तलवडकर, महेश शिंदे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत