HEADLINE

Breaking News

स्वच्छता ही सेवा – स्वच्छोत्सव २०२५ अंतर्गत मुंबई संशोधन केंद्रात विविध उपक्रम

  

विद्यार्थी, कर्मचारी व मच्छीमारांचा उत्स्फूर्त सहभाग; प्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध जागरूकतेवर भर    

जतिन मोरे : भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान देशभरात “स्वच्छता ही सेवा – स्वच्छोत्सव २०२५” साजरा करण्यात आला. या अभियानाचा एक भाग म्हणून आयसीएआर-सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजी (ICAR-CIFT) चे मुंबई संशोधन केंद्र यांनी विविध उपक्रम राबवून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीचा संदेश दिला.
              १७ सप्टेंबर रोजी केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन शपथग्रहण कार्यक्रमात सहभाग घेतला. या दिवशीच कार्यालयीन परिसरात ‘सेल्फी पॉईंट’ची उभारणी करण्यात आली तसेच “एक पेड माँ के नाम” या संकल्पनेतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. तर १८ सप्टेंबर रोजी कार्यालयीन परिसर व प्रयोगशाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी नियमित मोहिमेत स्वच्छ करणे कठीण असलेले काळे डाग (black spots) ओळखून वेळेत साफ करण्यात आले. १९ सप्टेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. “Turning the Tide on Plastic Waste” या विषयावर वैज्ञानिक श्री. श्रवणकुमार शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्व सर्जनशीलतेतून मांडले. २६ सप्टेंबर रोजी “स्वच्छ भारताकडे वाटचाल” या नावाने वॉकाथॉनचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७ ते ८.३० दरम्यान झालेल्या या वॉकाथॉनमध्ये केंद्रातील २२ कर्मचारी सहभागी झाले. ३० सप्टेंबर रोजी मच्छीमारांसाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात “माशांची स्वच्छ हाताळणी”, “मत्स्य कचऱ्याचा उच्च मूल्य उत्पादनासाठी उपयोग” या विषयांवर वैज्ञानिक व्याख्याने झाली. त्याचबरोबर “प्लास्टिक प्रदूषण” या विषयावर नुक्कड नाटक सादर करून मच्छीमारांना जागरूक करण्यात आले. या संपूर्ण कालावधीत झालेल्या उपक्रमांना कर्मचाऱ्यांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणीय जबाबदारीचे महत्त्व पटवून देत मुंबई संशोधन केंद्र, ICAR-CIFT ने महात्मा गांधींच्या स्वच्छ व शाश्वत भारताच्या संकल्पनेशी आपली बांधिलकी अधोरेखित केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत