अवैध धंद्यावर माणगांव पोलिसांकडून धाडसत्र, मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मारला छापा.
माणगांव : दि. १३ - माणगांव सध्या जोमाने फोफावणाऱ्या अवैध धंद्यावर कारवाईचे सत्र माणगांव पोलिसांकडून सुरू करण्यात आलेले आहे. अवैध धंद्यामुळे अनेक संसाराची होणारी परवड थांबविण्यासाठी माणगांव पोलिसांकडून धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. दि. ११ सप्टेंबर मोर्बा रोडवर चालणाऱ्या एका मटका अड्ड्यावर माणगाव पोलीसांनी छापा मारून कारवाई केली. तर सलग दुसऱ्या दिवशी अशाच प्रकारे माणगांव निजामपूर रोडवर गावडे कॉम्प्लेक्सच्या गल्लीमध्ये असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर माणगांव पोलिसांनी छापा मारला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. १२ सप्टेंबर दुपारी ३:१५ वाजण्याच्या सुमारास निजामपूर रोड गावडे कॉम्प्लेक्स च्या गल्लीत असणाऱ्या डे महाराष्ट्र मटका पॉईंट वर माणगांव पोलिसांनी छापा मारून ८२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत दोन आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी माणगांव पोलीस ठाण्यात कॉ .गु. रजि.नं.२९४/२०२३ महाराष्ट्र जुगार अधिनियम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. सानप हे करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत