सुधागड तालुक्यात आज विविध ठिकाणी भारतीय सैनिक वासुदेव दत्तात्रेय चोरघे यांचा सेवापूर्ती सोहळा
|सुधागड| |प्रशांत हिंगणे|
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची लढावू भारतीय सेनेमधील एक गौरवशाली मराठा रेजिमेंट बटालियनमध्ये कार्यरत असलेले भारतीय सैनिक वासुदेव दत्तात्रेय चोरघे, गाव- तोरणपाडा, तालुका सुधागड, रायगड जिल्ह्यातील २६ मराठा रेजिमेंट बटालियनमधून गौरवशाली कार्य करून सेवानिवृत्त होऊन आज दि. २ सप्टेंबर रोजी आपल्या मातृभूमीमध्ये सुखरूप माघारी येत आहेत.
सुधागड तालुक्यातील तोरणपाडा या गावचे सुपुत्र भारतीय सैनात कार्यरत असणारे सैनिक वासुदेव दत्तात्रेय चोरघे यांनी भारतीय सैन्य दलात १८ वर्ष ४ महिने सेवा केल्यानंतर ते दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानिमित्त त्यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न सुधागड तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सुधागड तालुक्यातील करचुंडे, जांभुळपाडा, आसरे, पेडली, तोरणपड़ा याठिकाणी आज दि. २ सप्टेंबर रोजी स्वागतोत्सव व सेवापूर्ती सोहळा साजरा होत आहे.
भारतीय सैनात कार्यरत असणारे सैनिक वासुदेव दत्तात्रेय चोरघे यांच्या सैनदलातील जीवनपट दिनांक ०२ डिसेंबर २००४ मध्ये मुंबई (तारापूर) येथे खपवळरप अवध मध्ये भरती होऊन २ मे २००५ मध्ये मराठा बटालियन लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव कर्नाटक
येथे कठोर ट्रेनिंग करत २००६ ला ट्रेनिंग पूर्ण केली. ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर २६ मराठा लाईट इन्फैंट्री बटालियन मध्ये नियुक्ती बटालियन मध्यप्रदेश महू येथे करण्यात आली. त्यानंतर २००६-२००७ मध्ये बेळगाव येथे रिडिंग क्लास शिकवण्यासाठी मराठा रेजिमेंट सेंटर बेळगाव येथेच पोस्टिंग झाली. २००८-०९ इन्फट्री स्कूल मह मध्यप्रदेश येथे पोस्टिंग. २००९ मध्ये २६ मराठा लाईट इन्फंट्री बटालियन सोबत (ऑपरेशन फाल्कन) अरुणाचल आणि आसाम, नागालैंड प्रदेश मध्ये तैनात होते. २०१० ते २०१२ मध्ये जम्मू आणि काश्मीर मधील अती दुर्गम पहाडी (थर्ड ग्लेशियर) बर्फिला इलाखा १६००० फुट उंचीवर वर कुपवाड फॉरवर्ड मछल सेक्टर मध्ये ५६ मराठा बटालियन राष्ट्रीय रायफलमध्ये तैनात होते. २०१२-१३ मध्ये २६ मराठा लाईट इन्फंट्री बटालियन सोबत पुणे येथे पोस्टिंग झाली. २०१४- १५ मध्ये अभिलेख कार्यालय बेळगाव येथे पोस्टिंग झाली. २०१५-२०१८ नॉर्थ सिकीम चायना बॉर्डर (ऑपरेशन फाल्कन) येथे १८००० फूट वर तैनाती तिथे चायना फौजवर निगराणी ठेवण्याचं कार्यभाग पूर्णत्वास नेला. २०१९-२०२० राजस्थान रेतीला इलाखा कोटा यथे बटालीयन मध्ये तैनात होते. २०२१ - २०२३ जम्मू आणि काश्मीर मध्ये पाकिस्तान लाईन ऑफ कंट्रोल अवघ्या १५०-२०० मीटरवर अती अतिसंवेदनशील सीमेवर तैनात होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत