HEADLINE

Breaking News

खोपोली-साजगाव-आडोशी एस. टी.(बस) सेवा पूर्ववत होणार, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पेण विभागीय कार्यालयाला निवेदन



|खालापूर| |वार्ताहर|


खालापूर दि. 21 : खालापूर तालुक्यातील खोपोली- साजगांव आडोशी एस-टी (बस) सेवा अपुरी असल्या कारणाने आडोशी साजगांव खोपोली स्थानिक प्रवास्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. महीला, वयोवृद्ध नागरिक, शालेय विद्यार्थी यांचे प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. 


साजगांव आडोशी हा विभाग औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर कामगारांची ये जा चालू असते. यामध्ये महिला कामगार व पुरुष कामगार यांची मोठ्या प्रमाणात गैर सोय होत असून महिलांना रात्री आपरात्री प्रवास करणे कठीण झाले आहे.
स्थानिक प्रवासी, कामगार, शालेय विद्यार्थी यांनी वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून एस-टी बस सेवा पूर्ववत होण्यासाठी मागणी केली. स्थानिक नागरिकांची प्रवासासाठी होणारी गैरसोय लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडी खालापूर तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ रायगड विभागीय कार्यालय रामवाडी पेन यांना निवेदन देण्यास आले.


पेण विभागीय कार्यालयातील आधिकारी यांनी तातडीने कर्जत डेपो सोबत संपर्क  करून एस-टी सेवा पूर्ववत करण्यासंदर्भात आश्वासन दिले.
यावेळी निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण भालेराव, पेण तालुका अध्यक्ष देवेंद्र कोळी, खालापूर तालुका युवक अध्यक्ष प्रशांत गायकवाड, पेण तालुका युवक अध्यक्ष संजय गायकवाड, खालापूर तालुका युवा महाचिव महेंद्र ओव्हाळ उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत