"आयुष्मान भव" मोहीम सुरू लाभ घेण्याचे आवाहन
रायगड दि.22 : जिल्ह्यातील सर्व वयोगटातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी "आयुष्मान भव" मोहीम हाती घेण्यात आली आहे. सर्व लाभार्थानी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश म्हसे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले आहे.
जन सामान्यांना एकाच छताखाली आरोग्य सेवा देण्यासाठी देशभरात 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत 'आयुष्मान भव' मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत 'अबाल वृद्धा'च्या 32 प्रकारच्या आरोग्य तपासण्या व मोफत उपचार केले जात आहे. आयुष्यमान भारत, आभा कार्डसह विविध आरोग्य सेवा देण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे यांनी सांगितले.
'आयुष्मान भव' मोहिमेतून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून अगदी घरापर्यंत जाऊन लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाची आरोग्याची तपासणी मोफत करण्यात येत असल्याने ग्रामस्थांच्या 'आरोग्याची नांदी' असल्याचे चित्र आहे.
सदर मोहिमेदरम्यान ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय स्तरावर दर सोमवारी खाजगी वैद्यकिय महाविद्यालातील तज्ञांमार्फत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. नियमितरित्या मोहिमेदरम्यान ग्रामीण भागामध्ये प्रा. आ. केंद्र, उपकेंद्र, नागरी आरोग्य केंद्रांम उपचारासाठी संदर्भित करण्यात आलेल्या रुग्णांना ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयाती मेळाव्यामध्ये तज्ञांमार्फत उपचार करण्यात येणार आहेत.
यामध्ये एकुण ९ ग्रामीण रुग्णालयामध्ये दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत १३५ आरोग्य मेळाव्याचे नियोजन करण्यात आलेले आहे तसेच एकूण ६ उपजिल्हा रुग्णालयमध्ये ९० आरोग्य मेळाव्याचे नियोजन
करण्यात आलेले आहे. रायगड जिल्हयातील एकूण २६७ आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये दर शनिवारी दि.३१ डिसेंबर अखेर ३५५५ आरोग्य मेळाव्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
२) आयुष्मान कार्ड :-
रायगड जिल्ह्याकरिता ६४९१०१ ऐवढे लाभार्थी असुन त्यापैकी २०८८८७ (३२.१८ टक्के
लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डचे वितरण करण्यात आलेले आहे. सदर मोहिमेदरम्यान आशामार्फत
मोहीम आयोजन करून उर्वरित लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डचे वितरण करण्यात येणार आहे.
३) आभा कार्ड :-
रायगड जिल्हयाकरिता २६३४२०० ऐवढे लाभार्थी असुन त्यापैकी ४७०३३६ (७.८५ टक्के लाभाथ्र्यांना आभा कार्डचे वितरण करण्यात आलेले आहे. सदर मोहिमेदरम्यान आभामार्फत मोहीम आयोजन करून उर्वरित लाभाय्यांना आभा कार्डचे वितरण करण्यात येणार आहे.
४) आयुष्मान सभा :-
रायगड जिल्हयामध्ये २ ऑक्टोबर २०२३ रोजी व दि. ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी की एचएन समिती / MAS च्या नेतृत्त्वाखाली ग्राम सभा तसेच शहरी भागात प्रभाग स्तरीय सभा आरोग्यकेंद्रामार्फत घेण्यात येणार आहेत.
५) १८ वर्षावरील पुरुषांची आरोग्य तपासणी :-
निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे या योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागात १८ वर्षावरील पुरुषांची आरोग्य तपासणी आयुष्मान आरोग्य मेळाव्यामध्ये उपकेंद्र, प्राथमिक आरो ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र शहरी प्राथमिक आरोग्य सामुदायिक आरोग्य केंद्र येथे करण्यात येणार आहे.
*आयुष्मान भव'तील तपासण्या* -
लहानमुलांसाठी : 'आयुष्मान भव' मोहिमे अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून अंगणवाडी व प्राथमिक शाळामधील 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी, जन्मजात
विकृती, शारीरिक व मानसिक विकास, कुपोषण याबाबत सेवा देण्यात येत आहेत.
वृद्धांसाठी : सर्व समावेशक आरोग्य सेवा, मानसिक आरोग्य, वाढत्या वयातील आजार व परिहारक
उपचार, मौखिक आरोग्य, नेत्र, कान, नाक व घसा तपासणी, समुपदेशन सेवा, योगा व वेलनस उपक्रम,
मोफत औषधी, प्रयोगशाळा तपासणी तसेच टेलीकन्सलटेशन सेवा देण्यात येत आहेत.
*आरोग्य तपासणी कार्यक्रमाची रूपरेषा* -
आठवडा 1 : मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, तोंड, गर्भाक्षय, ग्रीवा आणि स्तन कर्करोग तपासणी
आठवडा 2: क्षयरोग, कुष्ठरोग आणि इतर संसर्गजन्य रोग
आठवडा 3: माता आणि बाल आरोग्य, पोषण आणि लसीकरण
आठवडा 4: नेत्ररोग तपासणी आणि नेत्र निगा सेवा
000


कोणत्याही टिप्पण्या नाहीत