भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड जिल्हा चिटणीस पदी माननीय विठ्ठलजी सिंदकर यांची नियुक्ती.
|सुधागड||राहुल गायकवाड|
पेण सुधागडचे माजी आमदार धैर्यशील दादा पाटील यांचे अत्यंत जवळचे प्रामाणिकआणि विश्वासू कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे, असे श्री,विठ्ठलजी सिंदकर यांची दक्षिण रायगड जिल्हा भाजपा चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन पक्षाने श्री विठ्ठल सिंदकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. दक्षिण जिल्हा भाजपा कार्यकारिणी जाहीर झाली असून यामध्ये सुधागड तालुक्याचे अनुभवी कार्यकर्ते म्हणून ज्यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य आहे, असे व्यक्तिमत्व असणारे श्री विठ्ठल सिंदकर यांच्यावर भाजपा दक्षिण जिल्हा चिटणीस ही जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी ते शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्हा चिटनीस मंडळाचे सदस्य तसेंच परळी ग्रामपंचायतचे सदस्य, विरोधी पक्षनेते अशी विविध पदे त्यांनी सांभाळली आहेत. तालुक्यासह परळी ग्रामपंचायत मध्ये विकास कामे करण्याच्या बाबतीत विठ्ठलजी सिंदकर यांची वेगळी ओळख आहे. राजकीय पटलावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख तयार केली असून जांभूळपाडा जिल्हा परिषद आणि परळी पंचायत समिती गणातील प्रत्येक ग्रामपंचायत मधील कार्यकर्त्यांशी त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत,प्रत्येक निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची असते.पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण करणे ही त्यांची खासियत आहे. श्री, विठ्ठलजी सिंदकर यांना सामाजिक कार्याची सुद्धा आवड असून समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखात धावून जाणारे असे हे परळीतील व्यक्तिमत्व आहे. आगामी परळी ग्रामपंचायत च्या निवडणुका लक्षात घेता, विठ्ठल जी सिंदकर यांना भाजपाने जिल्हा चिटणीस पद दिलेला आहे,, त्या पदाचा आणि अनुभवाचा ग्रामपंचायतच्या राजकारणात वापर करून, नक्कीच परिवर्तन घडवण्याची ताकद त्यांच्यात आहे हे विरोधक चांगले ओळखून आहेत. भाजपा पक्षाने त्यांची चिटणीस पदी नियुक्ती केल्याबद्दल तालुक्यासह जिल्ह्यात देखील अभिनंदन होत आहे. कार्यकर्ता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री, विठ्ठलजी सिंदकर यांच्याकडे पाहिल्यावर समजते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत