पाली नगरपंचायत तर्फे स्वच्छता मोहिमेसाठी जय्यत तयारी
अमित गवळे
पाली, ता. 30 (वार्ताहर) स्वच्छ भारत अभियान अंतर्गत रविवारी (ता.1) पाली नगरपंचायततर्फे स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी पाली नगरपंचायतची तयारी व व्यवस्थापन पूर्ण झाले आहे. शनिवारी (ता.30) अशी माहिती नगरपंचायत मुख्याधिकारी विद्या येरूनकर यांनी दिली. तसेच याबाबत सविस्तर माहिती दिली.
15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. याचाच भाग असलेल्या रविवारी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेत श्री सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था व शहरातील तरुणांचा प्रामुख्याने सहभाग असणार आहे. ही स्वच्छता मोहीम बल्लाळेश्वर मंदिर व परिसर, पाली चिकन व मासळी बाजार आणि विसर्जन घाट या तीन ठिकाणी राबवली जाणार आहे. सदर मोहिमेचे उद्दिष्टे स्वच्छते विषयक जागरूकता व तरुणांच्या स्वच्छतेबाबतच्या सहभागाला चालना देणे हे आहे. तसेच टेकड्या, पर्यटन स्थळे किंवा शहरातील मुख्य ठिकाणी तरुणांच्या पुढाकारात विविध संघाद्वारे मोठ्या प्रमाणात स्वच्छता करणे हे आहे. असे मुख्याधिकारी विद्या येरूनकर यांनी सांगितले.
फोटो ओळ, पाली, नगरपंचायत कार्यालय पाली. (छायाचित्र, अमित गवळे)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत