इंदापूर शहरामध्ये एका अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार
माणगाव : दि. २७ - माणगांव तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर वसलेल्या इंदापूर शहरामध्ये एका अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार झाल्याची घटना घडली आहे आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, जानेवारी २०२३ पासुन नक्की दिनांक माहिती नाही मौजे इंदापूर (तळाशेत ) येथील घटनेतील आरोपीत गिरीष दिलीप नवगणे रा. नवगणे आळी इंदापूर याने पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहिती असूनही, जानेवारी २०२३ ( नक्की तारीख माहिती नाही ) पीडित मुलीला स्वतः च्या राहत्या घरी बोलावून लग्नाचे आमिष दाखवून शारिरिक संबंध ठेवले.
याबाबत माणगाव पोलीस ठाणे येथे कॉ.गु. रजि. नं. ३०७/२०२३ भा. दं. वि. स कलम ३७६ (२) (j) बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो) कलम ४, ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी नितिनकुमार पोंदकुळे, माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील ह्या करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत