बापरे !! खुरावले येथे आढळला दुर्मीळ मांजऱ्या साप
काळा अन् राखडी रंग पांढरे चट्टे असलेला दुर्मिळ प्रजातीचा मांजऱ्या साप सुधागड तालुक्यातील खुरावले येथील रहीवासी मुकुंद जाधव यांच्या घरी आढळून आला. याची माहिती मिळताच खुरावले येथील पेट्रोल पंप चे मॅनेजर सर्पमित्र संदीप जाधव यांनी सापाला मोठ्या शिताफीनं पकडले.
मांजऱ्या प्रजातीचा हा साप सुधागड तालुक्यात पहिल्यांदाच आढळून आला. सर्पमित्राने या दुर्मिळ मांजऱ्या सापाला सुरक्षितरित्या वनविभागाच्या स्वाधीन केले. यानंतर या दुर्मिळ सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या दुर्मिळ मांजऱ्या प्रजातीच्या सापाला इंग्रजीत ‘Forsten’s Cat Snake’ असे म्हणतात. हा दुर्मिळ मांजऱ्या साप निमविषारी असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत