वावोशी येथे स्वच्छ्ता अभियान संपन्न, ग्रामपंचायत वावोशी, नेहरू युवा केंद्र व भारतीय कृषि विमा कंपनीचा पुढाकार
वावोशी/जतिन मोरे :- स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात १ ऑक्टोबरला ‘एक तारीख-एक तास’ हा श्रमदानाचा उपक्रम राबवून राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. प्रधानमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज दि.१ ऑक्टोबर रोजी खालापूर तालुक्यातील वावोशी येथे स्वच्छ्ता ही सेवा, कचरामुक्त भारत हे अभियान ग्रामपंचायत वावोशी, नेहरू युवा केंद्र अलिबाग आणि भारतीय कृषि विमा कंपनी मुंबई क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत परीसर, प्राथमिक शाळा, राम मंदिर परिसर आणि गावातील रस्ते या ठिकाणी साफसफाई करण्यात आली तसेच ग्रामपंचायत परिसर व शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांनी प्रभात फेरी काढून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना भारतीय कृषि विमा कंपनी कडून रेनकोट वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कृषी विमा कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक मच्छिंद्र सावंत, ग्रामपंचायत वावोशीच्या सरपंच अश्विनी शहासने, उपसरपंच दिपा शिर्के, माजी उपसरपंच सुनीता भालेराव, सदस्य मयूर धारवे, पुनम भउड, रिया वालम, ग्रामसेवक विवेकानंद वासकर, पोलीस पाटील मनीष हातनोलकर, भारतीय कृषी विमा कंपनीचे खालापूर तालुका समन्वयक पंकज साखरे, गणेश सावंत, नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक हर्षद पाटील, मुख्याध्यापिका विद्या घरत, सामाजिक कार्यकर्ते संतोष हातनोलकर,अंगणवाडी सेविका पल्लवी मोरे, रेखा धारवे, गट प्रवर्तिका आश्र्विनी मोरे, मदतनीस वनिता पवार, शिपाई दत्ता बामुगडे, सर्व बचत गट सदस्य, महिला मंडळ, युवक मंडळ व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत