HEADLINE

Breaking News

वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे समारोप मोठया उत्साहात संपन्न

पेण: भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पेण आयोजित आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा,सतत चारमहिने सुरू असलेल्या वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे समारोप, पेण तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा सोनावणे साहेब यांच्या निवासस्थनी मु.वाशी तालुका पेण येथे शनिवार दिनांक. 28/10/2023 रोजी मोठया उत्साहात संपन्न झाले.याचे औचित्य साधत आद.चंद्रकांतदादा सोनावणे यांनी नव्याने बांधलेल्या स्वप्नपूर्ती या घराच्या नामफलाकाचे आनावरण रायगड भूषण आद. चंद्रकांतजी अडसूळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलें तर,नायब तहसीलदार तथा घराच्या मालकीण आद.सुजाता चंद्रकांत सोनावणे यांनी मुख्य प्रवेश द्वाराची फित कापून गृहप्रवेशाचे उदघाटन केलें.प्रथम आदर्शांचे पूजन करून,बौद्धचार्य कृष्णा गायकवाड, नारायण जाधव,राजेश गायकवाड, पांडुरंग जाधव यांनी गृह प्रवेश विधी संपन्न केली.यावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.गृह प्रवेश व वर्षावास धम्म प्रवचन मालिका समारोप या संपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रायगड जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे माजी संस्कार उपाध्यक्ष तथा जेष्ठ नेते आद.प्रकाशजी सोनावळे साहेब होते. तर,कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय शिक्षिक आद.संतोषजी जाधव यांनी अतिशय सुंदरअसे प्रवचन केले.या कार्यक्रमाला  शुभेच्छा व्यक्त करतअसताना  प्रमुख पाहुणे केंद्रीय पदाधिकारी,आद.सुनंदाताई वाघमारे, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा आद.उषाताई कांबळे, रायगड भूषण आद.चंद्रकांतजी अडसूळे, प्राध्यापक आद.एल. एन.कुमरे,रिजर्व बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी आद. नारायणजी जाधव साहेब,सुनिल पाटील, जिल्हा संघटक आद.सदानंद वाघपंजे, अलिबाग तालुका अध्यक्षा आद.सुप्रियाताई वाघपंजे आद.एम. जी.शिंदे साहेब,आद.प्रफुल्ल कनेटकर बौद्धचार्य नारायण जाधव आदींनी शुभेच्छा व्यक्त करतांना पेण तालुक्यात सुरू असलेल्या धम्म कार्याचे कौतुक केलें.कार्यक्रमाचे अध्यक्ष आद.प्रकाशजी सोनावळे आपले अध्यक्षिय मार्गदर्शनातं म्हणाले की एके काळी पेण तालुका हा धार्मिक कार्यात खुप मागे होता परंतु, पेण तालुक्याला चंद्रकांतदादा सोनावणे यांच्या रूपाने संघटण कौशल्य व सर्वगुण संपन्न असे अध्यक्ष लाभले आणि काही काळातच हा तालुका रायगड जिल्ह्यात धम्म कार्याने नावारूपाला आल्याचे आपण पाहत  असल्याचे सांगून पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा महिला सरचिटणीस आद.छायाताई, गवई कोषाध्यक्षा त्रिशलाताई सावळे जिल्हा पदाधिकारी शोभाताई, ज्योती ताई,आद.पांडुरंग जाधव, माजी नगर सेविकाआद.प्रतीभा ताई, जाधव, पेणचे अनिल कांबळे, वंचितचे संजय गायकवाड,प्रदिप गायकवाड, आद. रमेशजी कांबळे, पोलिस पाटील दुष्मी,आद.सचिनजी चितळे,राजेश गायकवाड,संस्थेचे उपाध्यक्ष संतोष अडसूळे,भगवान शिंदे,सरचिटणीस सचिन कांबळे, कोषाध्यक्ष नरेश गायकवाड,संस्कार सचिवा रेश्माताई जाधव,सचिव मंगेश कांबळे,संघटक भास्कर कांबळे, सुनिल खरात,सुरेश सोनावणे,विजय सर्वे,आनंद जाधव, भास्कर सर्वे,पत्रकार राजेश कांबळे, संतोष गायकवाड,हरिश्चंद्र गायकवाड, मधुकर गायकवाड,विभाग क्र.6 चे सरचिटणीस राहुल चितळे,दुश्मीचे विश्वास कांबळे, अंशिकाताई विश्वास कांबळे,संदीप कांबळे, प्रविण कांबळे, संदेश कांबळे, करण कांबळे,शशिकलाताई गायकवाड,त्याच बरोबर सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील नामवंत मंडळी, महिला भगिनीं मोठया संख्येने उपस्थित होते,आदरणीय चंद्रकांतदादा सोनावणे साहेब,यांनी आलेल्या सर्वांचे आभार व्यक्त करतांना सांगितले की माझ्या यशस्वी  धम्म कार्याची ताकत आपण सर्वजण आहात.आणि माझी कार्यकरणी ही माझी ऊर्जा आहें,तेव्हा संघर्षातून उत्कर्षांकडे कूच करणे हे माझे जीवन आहें.त्याला साथ  तुमची हवी आहे.  शेवटी सरणतय घेऊन मालिकेचे समारोप झाले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत