वंचित बहुजन आघाडी पेण तालूका अध्यक्ष मा. देवेंद्र मा. कोळी यांच्या घरी अनोखा गणपती उत्सव
| पेण | | संजय गायकवाड |
पेण तालुक्यातील नवघर कोळीवाडा येथे वंचित बहुजन आघाडी पेण तालूका अध्यक्ष मा. देवेंद्र मारुती कोळी यांच्या राहत्या घरी संकष्टी चतुर्थी (साखर चौथ) निमित्ताने गणपती उत्सव अनोख्या पद्धतीने होतो साजरा. या गणपती उत्सवा निमित्ताने सामाजिक बांधिलकी ठेऊन आपल्या सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ आप्तेष्ठ, सगे, सोयरे, मित्र, नातेवाईक सर्वांना एकत्र येऊन विचारांची देवाण घेवाण करायला लावणारा हा गणपती उत्सव. विविध कार्यक्रमाचे नियोजन करीत गणपती बाप्पाच्या निमित्ताने एकतेचे संदेश देत असतात.
देवेंद्र कोळी यांची दरवर्षीची संकल्पना "बाप्पा माझा विद्येचा देवता" या संकल्पने नुसार गणपती बाप्पाच्या दर्शनाला येणारे सर्व भाविक भक्त गणपती बाप्पाला हार, फुल, नारळ, अगरबत्ती न आणता शैक्षणिक साहित्य म्हणजे वही, पेन, पेन्सिल, खोडरबर सारखे शैक्षणिक साहित्य आणून गणपती बाप्पाच्या चरणी ठेवतात. गणपती विसर्जित झालं की सर्व शैक्षणिक साहित्य गरीब आदिवासी वाडी आणि आश्रम शाळेत वाटले जातात.
तसेच दि. ०३/१०/२०२३ रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत "चमत्कारामागील विज्ञान आणि बुवाबाजी, भूत भानामती, करणी" या विषयावर व्याख्यानात्मक प्रबोधन आयोजित केले होते. सदर व्याख्याना मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संदेश गायकवाड यांनी भुताची निर्मिती कशी होते , बुवा बाबा कसे फसवतात, हे सांगितले आणि जगदीश डंगर यांनी चमत्कार सादर केले व त्यामागील विज्ञान सांगितले. तसेच दि.०४/१०/२०२३ रोजी गणपती बाप्पा समोर परंपरे नुसार पेण तालुक्यातील वरवणे गावातील महिला मंडळ व मित्र परिवाराने पारंपारिक नृत्य सादर करीत परंपरा टिकवून ठेवून एकत्रित पणाचा संदेश दिला.
असे विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे नियोजन करीत सामाजिक बांधिलकीचा मेसेज या गणेशोत्सवा निमित्ताने दिला जातो. मा. देवेंद्र कोळी व यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध प्रकारचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत