पेण येथे 'सायबर क्राईम जनजागृती' एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
पेण येथील डॉ. पतंगराव कदम आर्टस् अँड कॉमर्स महाविद्यालयाच्या, महिला कक्षाद्वारे 'सायबर क्राईम जनजागृती' एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन. महिला कक्षामार्फत दरवर्षी विविध उपक्रमांच्यामाध्यमातून लिंगभाव समानता आंणि संवेदनशीलता वाढविण्याचा सतत प्रयत्न केला जात आहे. महाविद्यालयातील तरुणांमध्ये वाढती सायबर गुन्हेगारीबदल जागरूकता निर्मिती आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित क्षमतांचा विकास या दुहेरी हेतूने एकदिवसीय कार्यशाळा 'सायबर क्राईम जनजागृती' प्राचार्य डॉ. बाळासाहेब दुधाळे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 22 डिसेंबर 2023 रोजी महाविद्यालयामध्ये संपन्न झाली. सदर कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे पेण पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रतीक पोकळे आणि मॅडम मिनल शिंदे म्हणून लाभलेत.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रामध्ये पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रतीक पोकळे यांनी विद्यार्थीना 'वाढते सायबर गुन्हे आणि महिला सुरक्षा' याविषयी मार्गदर्शन केले. सायबर गुन्हयांमध्ये आरोपी अप्रत्यक्ष आणि अशिक्षित असून तो तंत्रज्ञानात तरबेज कसा असतो हे सांगून, सायबर गुन्हयाचे स्वरूप तसेच सोशल मीडिया फसवणूक, बैंकिग फसवणूक, लॉटरी आणि नोकरी आमिष फसवणूक, मॉर्फिग, फिशिंग, ऑनलाईन शॉपिंग इ. सायबर गुन्ह्यांच्या प्रकारांची माहिती श्री. प्रतीक पोकळे यांनी विद्यार्थयांना विविध उदाहरणांनी दिली. व्यक्तीच्या आर्थिक आणि शारीरिक सुरक्षितेसाठी सोशल मीडिया वरून येणाऱ्या विविध लिंक्स पासून आपली वैक्तिकता कशी जपावी, हे स्पष्ट करून सायबर गुन्ह्यांपासून कोणकोणती खबरदारी घ्यावी अशा मुद्द्द्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या द्वितीय सत्रामध्ये पोलीस उपनिरीक्षक मॅडम मिनल शिंदे यांनी विद्यार्थीना 'युवा आणि सुरक्षा' याविषयी मार्गदर्शन केले. मॅडम मिनल शिंदे यांनी पोक्सो कायदा, कलम नं. ३५४ इ. कायदेशीर बाजू स्पष्ट करून तरुण, तरुणींना सायबर गुन्हयांमध्ये पोलीस साह्यता कशी प्राप्त करावी, फोटो क्लोनिंग द्वारे होणारे सायबर गुन्हे इ. माहिती देऊन विविध अॅप वापरताना कोणकोणती खबरदारी पाळावी यामुद्यांवर विद्याथ्यर्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या अंतिम सत्रामध्ये प्रा. महेश भोपळे यांनी ऑनलाईन शॉपिंग खरेदी करताना होणारी फसवणूक कशी असते? याविषयी स्वानुभव विद्यार्थ्यांशी कथित केला तसेच विद्यार्थानी सायबर आणि महिला सुरक्षा याविषयी आपले प्रश्न मांडून आपल्या शंकांचे निरासन करून घेतले. कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. अस्मिता पाटील सूत्रसंचालन डॉ. अनिल वळवी, अध्यक्षीय मनोगत डॉ. बाळासाहेब दुधाळे तर आभार डॉ. आलम शेख यांनी केले. विशेष एकदिवसीय क्षमता संवर्धन कार्यशाळेस हवालदार स्वरा पाटील, रुपाली पालवे, नवनाथ भारती आदी मान्यवर आणि महाविद्यालयाचे प्राध्यापकवर्ग डॉ. एस. महादणे, डॉ.एस.डी.पवार, प्रा.एल. कुमारे, डॉ.बी.आर. सरगर, प्रा.आर. बागडे, प्रा.ए.एस.पुजारी, प्रा.एस.ए. गुरव, प्रा.एस.एम. मेघशाम, प्रा. व्ही.एम.वागटकर, प्रा.एस.एम. नायकवडी, प्रा. एम. आर. भित्रे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत