राजाराम मोरे यांना रायगड जिल्हा परिषद प्रशासनाकडून 'सहाय्यक प्रशासन अधिकारी' पदावर बढती
वावोशी/जतिन मोरे :- रायगड जिल्हा परिषद कार्यालयात कनिष्ठ प्रशासन अधिकारी ह्या पदावर कार्यरत असणारे राजाराम अनंत मोरे यांच्या कार्याची रायगड जिल्हा परिषद प्रशासनाकडून दखल घेत त्यांना बढती देत माणगाव पंचायत समिती येथे सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
विशेष म्हणजे राजाराम मोरे हे ८ जानेवारी १९९० रोजी माणगाव पंचायत समिती येथे रुजू झाले होते आणि त्याच ठिकाणी आता त्यांना सहाय्यक प्रशासन अधिकारी या पदावर बढती देण्यात आली आहे. राजाराम मोरे यांना प्रथम पदोन्नती हि १० ऑक्टोबर २००३ मध्ये बालविकास प्रकल्प विभागात मिळाली होती तर दुसरी पदोन्नती हि १ फेब्रुवारी २०१३ मध्ये म्हसळा पंचायत समिती येथे कनिष्ठ प्रशासन अधिकारी ह्या पदावर देण्यात आली होती. तसेच राजाराम मोरे यांनी सुधागड पाली पंचायत समिती येथे देखील रोखपाल पदावर काम केले आहे. एकंदरीत राजाराम मोरे यांना जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत, समाजकल्याण, प्राथमिक शिक्षण विभागात देखील काम केल्याचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांचे कामकाज पाहता प्रशासकिय दृष्टिकोनातून त्यांना हि तिसरी पदोन्नती पंचायत समिती माणगाव येथे सहाय्यक प्रशासन अधिकारी ह्या पदावर देण्यात आली आहे. त्यांच्या या बढतीमुळे त्यांच्यावरील प्रशासकिय कामकाजाची जबाबदारी वाढली असून ते त्या पदाला योग्य तो न्याय देतील या अपेक्षेने त्यांच्या हितचिंतकांकडून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत