HEADLINE

Breaking News

"स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाची व एकसंघपणाची आवड निर्माण होते." - प्राचार्य आर.डी. गावित




वावोशी/जतिन मोरे :- छत्तीशी विभागातील वावोशी येथे श्री छत्रपती विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये १२  जानेवारी ते १९ जानेवारी रोजी या दरम्यान श्री. स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्री. स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण होते शिवाय विद्यार्थ्यांनी एकसंघ राहून आपल्या आयुष्यामध्ये प्रगती साधली पाहिजे असे मार्गदर्शन विद्यालयाचे प्राचार्य आर.डी. गावित यांनी केले आहे.

       या सप्ताहामध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते, याच अनुषंगाने १५ जानेवारी रोजी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन गोरठण गावचे तंटामुक्ती अध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले असून या क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी, खो-खो, क्रिकेट या स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे.  विद्यार्थ्यांना शिक्षण आणि खेळ या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असून या दोघांनाही वेळ देता आला पाहिजे असे मार्गदर्शनपर उद्गार तंटामुक्ती अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी काढले. या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक एस. एम. मोरे, व्ही ए ठाकरे, ज्युनिअर कॉलेजचे मुख्य व्यवस्थापक पी.बी. शेळके, मोमीन सर, अलमद सर, मुकेश कोकणी सर, एलिया कोकणी सर, खरात सर, म्हात्रे मॅडम, कांबळे मॅडम, पडवळकर मॅडम, विद्यार्थी वर्ग आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत