सत्ता संपादन हेतू पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक
पनवेल: (चंद्रकांत गायकवाड) वंचित बहुजन आघाडी पक्षाचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात,समस्त बहुजन समाजाला एकत्र करण्याचे काम चालू आहे. या गोरगरीब बहुजन समाजाच्या हाती सत्ता संपादित करण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी सत्ता संपादन मेळावे घेतले जात आहेत. आणि तोच हेतू लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यात तसेच पनवेल तालुक्यात आज मोठ्या संख्येने बहुजन समाजाला एकत्र करून,सत्तेमध्ये सामील करून घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पनवेल कामोठे ठिकाणी ऐश्वर्या हॉटेलमध्ये बहुजन समाजाला एकत्र करण्याच्या दृष्टीने, मुस्लिम समाजातील विविध सामाजिक संघटनेतील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये अनेक मुस्लिम महिलांनी वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये मोठ्या संख्येने जाहीर पक्ष प्रवेश करण्याचे मत व्यक्त केले आहे.
सदर बैठकीचे मार्गदर्शन रायगड जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी कांबळे साहेब तसेच तालुका कोषाध्यक्ष श्री.चंद्रकांत जाधव साहेब यांनी केले. या बैठकीसाठी मुस्लिम समाजातील विविध सामाजिक संघटनेतू महिलांनी भाग घेतले होते. लवकरच या सामाजिक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश मोठ्या संख्येने व उत्साहत वंचित बहुजन आघाडी पक्षांमध्ये करण्यात येण्याची माहिती पक्ष श्रेष्ठींकडून देण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत