HEADLINE

Breaking News

‘सायबर सुरक्षतेच्या फायद्यांचा शोध' या एक दिवसीय कार्यक्रमाची यशस्विता.



  डॉ. पतंगराव कदम आर्टस् ऍण्ड कॉमर्स कॉलेज, पेण येथील महिला विकास कक्ष आणि पेण पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि १०/०१/२४ रोजी 'एक्सप्लोरिंग दि बेनेफिट्स ऑफ सायबर सिक्योरिटी' ह्या कार्यक्रमाचे आयोजन संपन्न झाले . याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक जाणीवता आणि जागरूकता उद्देश्याने प्रेरित असलेले मा.श्री.देवेंद्र पोळ (पोलीस निरीक्षक,पेण) उपस्थित होते.   कोरोना काळामधील सामाजिक अंतरामुळे स्मार्ट मोबाईल हातात आला आणि न दिसणाऱ्या, घातक अशा मोबाइल व्यसनच्या विळख्यात युवा वर्ग आला. 

        मा.श्री. देवेंद्र पोळ यांनी विद्यार्थ्यांना आपल्या सेवा कालावधीमध्ये घडलेल्या सायबर गुन्ह्यांच्या विविध केस स्टडीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. चिपळूण,नालासुपारा येथील केस स्टडीच्या माध्यमातून मोबाईलच्या अतिरिक्त वापरातून होणारे शारीरिक आणि मानसिक त्रास कसे झेलावा लागते, हे स्पष्ट करून फोटो क्लोनिंग मार्फत होणारे सायबर गुन्हे आणि त्यातून होणारी आर्थिक पिळवणूक तसेच त्यातून घडणाऱ्या आत्महत्या सारखे घातक परिणाम यांची जाणीव निर्मिती केली, सायबर सुरक्षा कशी घ्यावी तसेच भविष्यात 'कृत्रिम बुद्धिमत्ता' सारख्या तंत्रज्ञानातून होणाऱ्या संभाव्य दुष्परिणांचे भाकीत करून युवकांना मोबाईलचा अतिरिक्त वापर, ऑनलाईन गेमिंग-रमी ,पब्जची सारख्या घातक खेळांपासून परावृत्त होऊन मैदानाकडे, पुस्तक वाचन यासारख्या चांगल्या वृत्तीकडे स्वतःस कसे वळविता येईल याविषयी मार्गदर्शन केले.

          सुदृढ समाज निर्मिती हेतूने आयोजित ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सौ.जे.एम.अडलीकार यांनी, अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ. बाळासाहेब दुधाळे यांनी तर आभार प्रा.सौ.किरण काटकर यांनी केले. तसेच सूत्रसंचालन प्रा.सौ.अस्मिता पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापकवर्ग डॉ.श्रीकांत महादणे, प्रा.राजेंद्र शिंगटे, डॉ. आलम शेख, डॉ.सुनिल पवार, डॉ.अनिल वळवी, डॉ.विनायक पवार, प्रा.लक्ष्मण कुमारे, डॉ.बाळासाहेब सरगर, प्रा.रामहरी.बागडे, प्रा.ए.एस.पुजारी, प्रा.संतोष गुरव, प्रा.संजय मेघशाम, प्रा.व्ही.एम.वागटकर,प्रा.एस.एम.नायकवडी, प्रा.एम.आर.भित्रे आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत