वंचित बहुजन युवक आघाडीच्या प्रयत्नाने पेन पनवेल एसटी सुरू
पेण - प्रतिनिधी- रायगड जिल्ह्याचे महत्त्वाचे शहर असलेल्या पेन शहरात प्रवाशांची फार मोठी रेलचेल असते. मुंबई पनवेल कडे जाणारे प्रवासी मोठ्या प्रमाणात असतात. मात्र रात्री दहा ते अकराच्या दरम्यान पेन एसटी डेपो मध्ये कुठलीही बस पनवेल मुंबईकडे जाणारी नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते . याबाबत वंचित बहुजन युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष संजय गायकवाड यांचकडे वाहतूक सेवा देण्यात यावी अशी प्रवाशांनी याबाबत तक्रार केली होती.
याच अनुषंगाने पेन पनवेल एसटी वाहतूक सुरळीत व्हावी याकरिता संजय गायकवाड यांनी पेन डेपो मॅनेजर यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रव्यवहार केला होता. याची दखल घेत पेण डेपो ने पेन पनवेल एसटी रात्री दहा ते अकराच्या दरम्यान सुरळीत सुरू केली. पनवेल एसटी सुरळी सुरू झाल्याने प्रवाशांनी संजय गायकवाड यांचे आभार मानले. याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की जनतेसाठी वंचित बहुजन आघाडी नेहमी प्रयत्नशील असते हे काम करत असताना माझ्या समवेत रायगड जिल्ह्याच्या युवक अध्यक्ष अमित गायकवाड रायगड जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक दिव्यांग असेल लॉयर सचिन गायकवाड महिला अध्यक्षा महिला तालुकाध्यक्ष अश्विनीताई ठाकूरउपाध्यक्ष सुनील शिंदे महासचिव प्रदीप गायकवाड मुन्ना मुल्ला उपाध्यक्ष अविनाश जाधव किरण जाधव सुरज गायकवाड नारायण वाघमारे तसेच महिला रेखा सिंग दीप्ती यादव महिला कार्यकारणी उपस्थित होत्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत