वावोशी येथील विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा, विद्यार्थ्यांच्या सुंदर कलाकृतीने प्रेक्षक भारावले
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील प्रत्येकी एका वर्गास 'बेस्ट क्लास अवॉर्ड' देण्यात आले तसेच वार्षिक क्रीडा महोत्सवात विशेष प्राधान्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना तसेच कबड्डी व खो-खो या क्रीडास्पर्धामध्ये विजयी झालेल्या संघांना ट्रॉफी देण्यात आली. अशा प्रकारे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. शिवाय मान्यवरांपैकी गोदरेज अँड बॉईस कंपनीचे व्यवस्थापक टी.डी. चव्हाण व प्रसिद्ध उद्योजिका प्रिया कोलारा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांचे देखील विशेष कौतुक केले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेची यथोचित माहिती तसेच या शैक्षणिक वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा, साजरे केलेले सण, समारंभ याविषयी यथोचित माहिती दिली. त्यानंतर इयत्ता नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी जुन्या व नव्या बहारदार गाण्यांवर नृत्य सादर करुन रसिकांचे चांगले मनोरंजन केले. भक्तीगीत, ऐतिहासिक गीत, शेतकरी गीत, कोळी गीत बालगीत, देशभक्तीपर गीतांवर अप्रतिम नृत्ये सादर केली. तसेच इयत्ता नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी देखील स्टेजवर रॅम्प वॉक केले. या सर्व कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यामधील उत्साह अवर्णनीय होता. या कार्यक्रमाला गोदरेज अँड बॉईस कंपनीचे व्यवस्थापक टी.डी. चव्हाण, उद्योजिका प्रिया कोलारा, इटीसी ऍग्रो कंपनीचे व्यवस्थापक सुनील लोखंडे, मल्लम रामा मोहन, सामाजिक कार्यकर्ते मोहन पाटील, विवेकानंद शिक्षण संस्था विभाग प्रमुख प्रकाश हाके, एस. सी. महाजन, माजी मुख्याध्यापक एस.आर.बेडगे, मुख्याध्यापक आर. डी. गावित, एस.आर.पाटील, मुख्याध्यापिका मानसी पाटील, अर्चना कटके, माजी सरपंच गिरीधर पिंगळे गुरूजी, महेश पाटील, उपसरपंच रमेश पाटील, उपसरपंच दीपा शिर्के, वृषाली शिर्के, वडवळचे माजी उपसरपंच अनिल मरागजे, पोलीस पाटील विद्याधर जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष भालचंद्र पाटील, सल्लागार सुभाष पाटील, सलीम शेठ, सामाजिक कार्यकर्ते जगदीश पाटील, दिपक पाटील, शाळेचे सर्व हितचिंतक, पी.टी.ए सदस्य तसेच परिसरातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन करणारे शाळेच्या सहशिक्षिका शर्मिला मेहेतर ,नीलम मोरे, भक्ती विद्वांस, वैभवी जाधव, सोनाली लबडे यांनी केले होते तर सूत्रसंचालन तेजल शेट्ये व मिथिलेश गेहलोट यांनी तर टेक्निकल सहकार्य सहशिक्षिका प्राची बामणे, शिवानी मनवे तसेच सर्व वर्गं शिक्षकांनी केली. होती.
"विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे कार्यक्रम, प्रत्येक विद्यार्थ्यावर शिक्षकांचे असलेले बारीक लक्ष, पालकांचा सहभाग यामुळे शाळेची लोकप्रियता वाढून उत्तरोत्तर प्रगती होताना दिसत येत आहे. या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे पुढील वर्षासाठी आतापर्यंत जवळजवळ १९ विद्यार्थ्यांनी आपल्या विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि ही बाब शाळेसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे."
- मुख्याध्यापिका मानसी पाटील, विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल, वावोशी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत