आयु. रघुनाथ विट्ठल वाघमारे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्ताने ,आदिवासी आश्रम शाळा - चिवे येथील मुलांना शैक्षणिक मदतीचा हात
पाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील अतिशय दुर्गम गावचे मौजे हातोंड चे सुपुत्र आयु. रघुनाथ विट्ठल वाघमारे यांचा 75 वा वाढदिवसाचे औचित्य साधून 15 जुलै 2024 रोजी वाघमारे कुटुंबीयांनी आदिवाशी आश्रम शाळेतील सुमारे साडेतीनशे मुलांना शैक्षणिक साहित्य देवून खाऊ वाटप केले.
आयु. र. वि. वाघमारे गुरुजी यांची सुरुवातीची नोकरी यांच आश्रम शाळेत झाली होती. इथे ते मुक्कामी राहत असत. त्यांचा मोठा मुलगा राजेंद्र यांचा जन्म देखील इथलाच आहे. आयुष्याची भाकरी त्यांना खऱ्या अर्थाने इथूनचं भेटली. ते ॠणानुबंध मनाशी कायम ठेवून , आपल्या पत्नी समवेत मुलं ,मुली ,सुना ,जावई ,नातवंडे सह या आश्रम शाळेस भेट दिली. त्याकाळी राहात असलेली खोली अजूनही जशीच्या तशी आहे. फक्त छत बदलले आहे आणि पोटमाळा काढला आहे व जमिनी ऐवजी टाइल्स बसवल्या आहेत. ही खोली सर्व मुलांनी नातवंडांनी आवर्जून पाहिली आणि इतिहास जतन करून डोळ्यात साठवून ठेवला.
शाळेतील शिक्षिका व विद्यार्थीनिनी ओवाळूण औक्षण केले. सुंदर असे स्वागत गीत गाऊन वातावरण आनंदीमय केला. आयु. महाबळे सरांनी सुंदर सूत्रसंचालन केले ,आयुनि. पिंगळे मॅडम यांनी मार्गदर्शन करून प्रेरीत केले. आयु. गुरव सरांनी प्रमुख अतिथिचा त्यांना परिचित असणारा इतिहास कथित केला. दरम्यान आयु. र. वि. वाघमारे ( गुरुजी ) , त्यांचा मुलगा सिद्धार्थ व राजेंद्र यांनी मुलांना मार्गदर्शन केले. प्रो. मिनाक्षी विकास म्हस्के - वाघमारे यांनी सुंदर गोष्ट सांगितली.
यावेळी वाघमारे कुटुंबातून आयुनि .सुनंदा रघुनाथ वाघमारे (पत्नी ) आयु. राजेंद्र -सिद्धार्थ - राहुल (मुलं ), आयुनि. अर्चना - रागिणी - सोनल (सुना ) , आयुनि. संध्या - मिनाक्षी (मुली ) , आयु. मिलिंद कासारे , आयु. विकास म्हस्के (जावई ) ,स्नेहल , दिक्षा ,दिक्षा कासारे , ईशीता , अपर्णा , कुणाल आणि शौर्य ( नातवंडे ) यांची उपस्थिती अभ्यासू दर्शक इतिहासाच्या पाऊल खुणा जोपासणारी राहिली.
आश्रम शाळेतील आयु. जे. एम. गुरव सर (प्रा. मुख्याध्यापक ) , आयुनि. एस. व्ही. पिंगळे मॅडम (मा. मुख्याध्यापिका ) , आयुनि. एस. एल. चव्हाण मॅडम (प्रा. शिक्षिका ), आयुनि. आर. डी. काळे मॅडम (मा. शिक्षिका ) , आयु. के. आर. महाबले सर ( प्रा. शिक्षक ), आयु. आर. आर. खोपडे सर (प्रा. शिक्षक ), आयुनि. ए. आर. चाटे मॅडम (प्रा. शिक्षिका ), आयुनि. कु. जे. वारगुडे मॅडम (मा. शिक्षिका ), आयुनि . आर. आर. रुईकर मॅडम ( प्रयोगशाळा परिचर ), आयु. जी. जे. आंबोरे सर ( वसतीगृह अधीक्षक ), आयुनि. एच. एस. वळवी मॅडम (वसतिगृह अधिक्षीका ), आयु. एस. डी. परबलकर (शिपाई ), आयुनि. डी. डी. जगताप (कामाठी ), आयु एम. आर. सानप (स्वयंपाकी ), आयु. एस. एस. कांबळे (स्वयंपाकी ), आयु. ए. एच. बावधने (स्वयंपाकी ),आयु. एम. डी. शिर्के (स्वयंपाकी ) आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यास मौलिक सहकार्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत