द्या एक मदतीचा हात उपक्रमास मिळाली उरणच्या अधिराज ची साथ*" , रायगड जिल्हा परिषद शाळा - हातोंड , केळगान सह अनेक शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. .. ..
पाली
उरणचा अधिराज म्हणजे एक दोन वर्षांचा चिमुकला बालक , शाळेत जायचं वय नाही आणि आदिवासी दुर्गम खेड्यापाड्यातील शाळेय मुलांना शैक्षणिक मदतीचा हात देण्यास सरसावत आहे. अर्थात त्यांचे आदर्शवत आई बाबा आयु. दिनकर गायकवाड व आयुनि. आरती दिनकर गायकवाड या उभयतांनी आपल्या या चिमुकल्या लेकरावर लहानपणापासूनच संस्कारांचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. अधिराजचा पहिला वाढदिवसानिमित्ताने महागाव ,चंदरगांव , हातोंड पंचायत हद्दीतील सर्व शाळेतील मुलांना फार मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य वाटप केले होते.
भोजन दान केले होते. डोंगरपट्टीने अनुभवलेला हा ऐतिहासिक उपक्रम होता. अधिराज चे आई वडील हे अत्यंत साधे आहेत. गडगंज पैशाने श्रीमंत नाहीत. जे आहे त्यातून ते त्यांच्या उत्पन्नाचा विसावा भाग अशा प्रकारे दान करत असतात. आपल्या चिमुकल्याला सुद्धा लहानपणापासून सांगत आहेत बाळा तुला अशा पीडित , दुर्गम भागातील उपेक्षित समाजाला आधार द्यायचा आहे. शिक्षणानेच मनुष्याची प्रगती होते. मनुष्यातून शिक्षण वजा केल्यास तो मनुष्य राहत नाही. तो एक ओझं वाहणारा जनावर गुलाम होतो. महामानवांचा ,समाजसुधारकांचा लढा असा होता तो अधिराज तुला जिवंत ठेवायचा आहे. सढळ हस्ते दान देवून जणू काही ही शिकवण अधिराजला दिली जात आहे. असे जाणवते.
हातोंड गावचे सुपुत्र , मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस हवालदार आयु. राजेंद्र वाघमारे यांनी गेल्या आठ वर्षांपासून सुरू केलेल्या " *द्या एक मदतीचा हात , सामाजिक शैक्षणिक बांधिलकीचा*" , यांस समाजातील अनेक दानशूर व्यक्तिमत्व साथ देवून ,उपेक्षित दुर्लक्षित आदिवासी व आर्थिक मागास समूहातील मुलांना शैक्षणिक मदतीचा हात देत आहेत.
उरण येथील सामाजिक कार्यकर्ते आयु. सुनील गायकवाड साहेब यांनी राजेंद्र वाघमारे यांच्याशी संपर्क साधला आणि हा उपक्रम घडवून आणला. डी. के. ग्रुप उरण ने पुढाकार घेतला. विजय लोंढेकर , विनायक ननावरे , संतोष मोघे , विकास निकाळजे , लक्ष्मण वाल्मिकी , कुणाल म्हात्रे , सुभाष बनसोडे , प्रभाकर जाधव , संतोष पाटील , संतोष गायकवाड , सचिन धुळे , रामदास दळवी , रोहित दळवी , सुमित दळवी , अंकुश दळवी , पुष्पा चौधरी , सुरेश गायकवाड , विशाल गायकवाड यांच्या उपस्थिति बरोबरच अधिराजचे आजी आजोबा , नातेवाईक ,मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.
माठल शाळेचे शिक्षक आयु. अजय जायभाये यांनी सुंदर शब्दांकन करून प्रास्ताविक केले व प्रबोधित केले. शाळेतील मुलांनी स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत केले. केंद्र प्रमुख आयु. घनश्याम हाके सरांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. मागील वर्षी आधिराज चा पहिला वाढदिवस महागाव येथे साजरा केला तेव्हा या विभागातील शाळेय मुलांना दिलेली मदत वर्षभर पुरली. आधिराजला अनेक शुभ आशीर्वाद देऊन तो या देशातला सर्वोत्तम नागरीक बनावा किर्तीवंत व्हावे या सदिच्छा व्यक्त केल्या. दरम्यान , या गावचे सुपुत्र सेवानिवृत्त पदोन्नती मुख्याध्यापक आयु. र. वी. वाघमारे गुरुजी यांची व त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिति वंदनिय होती. आयु. योगेश चव्हाण सर (प्रा. शा. चव्हाणवाडी ), आयुनि . सिमा फुंदे मॅडम (प्रा. शा. हातोंड ), आयु. अंकुश काकरा सर ( मुख्याध्यापक - प्रा. शा. हातोंड ) , आयु. देविदास जाधव सर (प्रा. शा. गोंदाव ), आयु. गोकुळ गायकवाड सर (प्रा. शा. केळगान ) , आयु. शंकर जेदे सर ( प्रा. शा. कसईशेत ) ,मा. अजय जायभाये सरांनी सर्वांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत