रा. जि. प. सिद्धेश्वर शाळेचा 149 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न
रायगड जिल्हा उत्तर प्रतिनिधी/मंगेश यादव
सिद्धेश्वर शाळेचा 149 वा. वर्धापन दिनांक 6 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थीनी सौ. लीलावती रघुनाथ सितापराव यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील पहिली ते सातवी मध्ये वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण व सिद्धेश्वर गावातील चालू वर्षी दहावी ते बारावी ते पंधरावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व विशेष प्राविण्य मिळवलेल्या माजी विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा बक्षीस देऊन साजरा करण्यात आला.
यावेळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना बक्षीस वितरकांनी बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापक कमिटीने तसेच शाळेय शिक्षकांनी बरीचशी मेहनत घेतली. आजच्या या कार्यक्रमासाठी भोजनाची व्यवस्था गणेश सावंत व गणपत जाधव यांच्याकडून करण्यात आली होती. या कार्यक्रमात कायम ठेव देणगीदारांचा सन्मान करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. विद्यार्थी प्रतिनिधीचे मनोगत, मुख्याध्यापकांचे मनोगत त्यानंतर प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी सुधागड साधूराम बांगारे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना सांगितले. ज्या शाळेत आपण घडलो त्या शाळेला आपण कधी विसरायचे नाही. तसेच आई-वडील यांना कधी विसरू नका. शाळा आहे दिशा देणारे यंत्र आहे. आपल्या शाळेसाठी शिक्षक कमी असताना शिक्षकाची व्यवस्था माझ्याकडून करण्यात आली. तसेच आपणास शाळेसाठी इतर सुविधा उपलब्ध करून देईल. आपली शाळा ही शिक्षणात पुढे आहे. तसेच निसर्गप्रेमी शिक्षक भिलारे गुरुजी आपल्या शाळेला लाभल्याने झाडेझुडपे, रोपे तयार करून शाळेभोवती लावल्याने शाळा सौंदर्यवान दिसू लागली आहे. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना आपली शाळा बक्षीस पात्र असल्याने मुख्यमंत्री माझी शाळा व सुंदर शाळा यासाठी तीन लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे. ते बक्षीस जिंकण्यासाठी आपल्याला संधी आहे ते आपल्या शाळेला मिळू शकते. यासाठी शिक्षक आपले योगदान आपल्यासाठी देतायेत त्याचा फायदा घ्यायचा आहे. तसेच शाळेय व्यवस्थापक कमिटी आपणास सहकार्य करण्यास तयार आहे. अशाप्रकारे या कार्यक्रमात आपले मनोगत बांगरे यांनी व्यक्त केले. तसेच केंद्रप्रमुख यांनी आपल्या मनोगतातून शाळेय विद्यार्थ्यांचे व शाळेचे गुणगौरव गायले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर सिद्धेश्वर ग्रामपंचायत सरपंच आशिका कैलास पवार, गटशिक्षणाधिकारी सुधागड साधूराम बांगारे, उपसरपंच शरद किंजवडे, ग्रामपंचायत सदस्या समृद्धी संतोष यादव, केंद्रप्रमुख सिद्धेश्वर कैलास म्हात्रे, ग्रामसेवक प्रवीण पाटील, सामाजिक कार्यकर्ते परमानंद राईलकर, माजी उपसरपंच, मा तंटामुक्ती अध्यक्ष संजय शिंदे, मा. उपसरपंच योगेश सुरावकर, पोलीस पाटील सुनील पोंगडे, ग्रामपंचायत सदस्य यादव मॅडम, ग्राम सेवासंघ सुरेखा यादव, आशा वर्कर मनीषा पोंगडे, शाळेय व्यवस्थापक कमिटी आजी-माजी विद्यार्थी, गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्या उपस्थितीत रा . जि.प. शाळा सिद्धेश्वर 149 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत