सुधागड तालुक्यातील नागरिकांची अद्यावत हॉस्पिटल प्रतीक्षा केव्हा संपणार.आणखी कीती मृत्यू ची वाट पाहणार गीरीश काटकर यांचा संतप्त सवाल
( जत्रा स्पेशल) सुधागड तालुक्यातील नागरिकांची अद्यावत हॉस्पिटल प्रतीक्षा केव्हा संपणार.आणखी कीती मृत्यू ची वाट पाहणार गीरीश काटकर यांचा संतप्त सवाल सुधागड तालुक्यामध्ये अद्यावत हॉस्पिटल नसल्याकारणाऱ्या अनेक लोकांना नाहक आपला बळी द्यावा लागत आहे.
गेली अनेक वर्ष झाले सुधागड तालुका ग्रामीण रुग्णालयाची वाट पाहत आहे . यासाठी सामाजिक कार्यकर्ते महेश पोगंडे महाराज यांनी सहा वर्ष नवीन ग्रामीण रुग्णालय व्हावं याकरिता प्रयत्न केले होते .त्यांच्या या प्रयत्नांना सहा वर्षानंतर यश आले. मात्र मागील दीड वर्षापासून ग्रामीण रुग्णालयाचे केवळ कामच सुरू आहे. अद्याप पर्यंत ते पूर्ण झालेला नाही. येथील स्थानिक पुढाऱ्यांनी व आमदार खासदारांनी केवळ जनतेच्या अपेक्षांना वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत. अनेक वर्ष उपोषण आणि आंदोलन करून देखील ग्रामीण रुग्णालय होत नव्हतं हे व्हावं अशी मागणी केल्यानंतर त्याच्या कामाला सुरुवात झाली मात्र गेली तीन वर्षापासून ते काम सुरू आहे अजून पर्यंत ग्रामीण रुग्णालय सुरू झालेला नाही. यामुळे सुधागड तालुक्यात जर कुठे अपघात झाला, किंवा कोणाला हृदयविकाराचा झटका आला, किंवा कुठलीही अतिप्रसंग झाला तर येथे सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने येथील नागरिकांना जीव गमवावा लागतो. सुधागड तालुक्यापासून उपचारासाठी जायचं असेल तर खोपोली पनवेल अथवा रोहा या ठिकाणी जावं लागतं . ही सर्व ठिकाण सुधागड तालुक्यापासून 30 किलोमीटरच्या पुढील अंतरावरती आहेत. मधल्या काळात कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याने येथील नागरिकांना आपला प्राण गमवावा लागतो. नुकताच पाचछापुर एका तरुणाचा उपचारा अभावी मृत्यू झाल्याने सामाजिक कार्यकर्ते गिरीश काटकर यांनी संताप व्यक्त केला असून लवकरात लवकर ग्रामीण रुग्णालय व अद्यावत रुग्णालय सुधागड तालुक्यात व्हायला पाहिजे अशी मागणी साप्ताहिक जनतेची जत्रा सोबत चर्चा करताना केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत