HEADLINE

Breaking News

पाली खोपोली राज्य महामार्गावर मोठे होर्डिंग कोसळले सुदैवाने घाटकोपर घटनेची पुनरावृत्ती टळली सर्व अनधिकृत होर्डिंगवर कारवाई न झाल्यास मनसे छेडणार तीव्र आंदोलन






अमित गवळे 


पाली, ता. 3 (वार्ताहर) पाली खोपोली राज्य महामार्गावर उंबरे गावाजवळ शनिवारी (ता. 3) एक मोठे होर्डिंग कोसळले असून त्याचा काही भाग रस्त्यावर आला आहे. सुदैवाने यावेळी कोणते वाहन व पादचारी तिथून जात नसल्यामुळे दुर्घटना घडली नाही. या मार्गावरील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई न झाल्यास मनसे तीव्र आंदोलन छेडल असा इशारा मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे यांनी या घटनेनंतर प्रशासनाला दिला आहे. 


      हे लोखंडी अवजड होर्डिंग पडतांना येथून एखादे वाहन किंवा पदाचारी जात असते तर घाटकोपर येथील दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली असती, असे सुनील साठे म्हणाले.  तसेच हे होर्डिंग लावण्यासाठी संबंधित जाहिरातदाराने एमएसआरडीसीची परवानगी घेतली आहे की नाही याची चौकशी करण्यात यावी. आणि अशा स्वरूपाचे जेवढे होर्डिंग असतील त्यांची चौकशी करावी व ते अनधिकृत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा मनसे तर्फे सर्वात मोठे आंदोलन केले जाईल. असा इशारा सुनील साठे यांनी दिला. 



फोटो ओळ, पाली, पाली खोपोली राज्य महामार्गावर उंबरे गावाजवळ कोसळलेले होर्डिंग. (छायाचित्र, अमित गवळे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत