ताकई आडोशी मार्गावरील चिंचवली येथील नवीन पुलाचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत प्रवाशांच्या अडचणीत भर
ताकई, आडोशी मार्गावरती चिंचवली येथील कमानी ऑइल कंपनी समोर नवीन पुलाचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत असून सदर बांधकामामुळे येथील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून जुन्या पडीक अवस्थेत असलेल्या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक चालू असल्यामुळे येथे कधीही पू ल कोसळून जीवित हानी वित्तहानी होऊ शकते . याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे .प्रशासन कोणाची वाट पाहत आहे जीवित होण्याची वाट पाहत आहे . वित्त आणि होण्याची वाट पाहत आहे का?
असा सवाल येथील जनता करत आहे .नवीन पुलाचे बांधकाम चालू होऊन सहा महिने उलटले तरी अद्याप या पुलावरून रहदारीची कोणत्याही प्रकारची वर्दळ अद्याप चालू नसल्यामुळे जुन्या झालेल्या जीर्ण पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक चालू आहे .या वाहतुकीमुळे ऐन पावसाळ्यामध्ये कधीही अपघाताची शक्यता नाकारता येत नाही .भविष्यात यामुळे मोठा अनर्थ घडू शकतो .याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे का ? जाणून बुजून लोकांच्या जीवांशी खेळ होत आहे का ?प्रशासन कोणाची वाट पाहत आहे . असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत