रायगडमध्ये रिपब्लिकन पक्षात शक्तीसंवर्धन: हजारो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश, खोपोली ठरले चळवळीचे केंद्र
असंख्य कार्यकर्त्यांचा आरपीआय (आठवले) पक्षात प्रवेश, पक्षाच्या बळकटीसाठी महत्वपूर्ण निर्णय
वावोशी/जतिन मोरे :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या विचारधारेला पाठिंबा देत व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक आणि जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत रायगड जिल्ह्यातील खालापूर व खोपोली भागातील असंख्य कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम खोपोलीमधील संगम हॉल मध्ये संपन्न झाला असून या मोठ्या प्रमाणात झालेल्या पक्षप्रवेशामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चा रायगड जिल्ह्यातील प्रभाव आणखी वाढला आहे.
कार्यक्रमाच्या वेळी खोपोलीला रिपब्लिकन चळवळीचे प्रमुख केंद्र म्हणून घोषित करण्यात आले. यावर प्रकाश टाकत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी, "टायगर अभी जिंदा है" असे ठाम विधान करून विरोधकांना इशारा दिला.
"सत्ते सोबतच आपल्या हातात पदे देखील असली पाहिजेत त्यासोबतच सर्वसामान्यांची कामे झाली पाहिजेत तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ आली तर रस्त्यावर उतरण्याची जबाबदारी ही आपली सर्वांची असली पाहिजे असे मार्गदर्शन कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. शिवाय तळागाळातील शोषित वंचित माणसाचा विचार करणारे नेतृत्व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रूपाने रिपब्लिकन पक्षाला लाभले असून सामाजिक न्याय विभागांच्या योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व जिल्हाध्यक्षांनी आपल्या जिल्ह्यात लक्ष द्यावे असे आदेश आठवले साहेबांनी दिले असल्याचे देखील त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात स्पष्ट केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्रासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि रिपब्लिकन पक्ष तुमच्यासोबत ताकदीने उभा राहील," असे सांगून पक्षाच्या सामाजिक बांधिलकीवर भर दिला.
या ऐतिहासिक प्रवेश कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनावणे, महाराष्ट्र प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे, कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे, कोकण प्रदेश उपाध्यक्ष काशिनाथ रूपवते, आदी प्रमुख नेत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कांबळे, खालापूर तालुका अध्यक्ष महेंद्र धनगावकर, कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड, सुधागड तालुका अध्यक्ष राहुल सोनावणे, तसेच रायगड जिल्हा युवक सचिव सुशील गायकवाड चिंतामणी सोनावणे, रायगड जिल्हा संघटक अरुण सदाफुले, रायगड जिल्हा युवक उपाध्यक्ष लखन पवार, सुधागड तालुका युवक अध्यक्ष निशांत पवार, खोपोली शहर अध्यक्ष नितीन वाघमारे, खोपोली शहर उपाध्यक्ष नितीन जगताप, खालापूर तालुका युवक अध्यक्ष संदेश कांबळे,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष फारुख शेख, खोपोली शहर युवक अध्यक्ष रुपेश रूपवते, खोपोली शहर युवक उपाध्यक्ष निलेश परदेशी, प्रवीण महाडिक, श्रीकांत आठवले, संतोष मोहिते, निलेश वाघमारे, आदित्य पवार यांच्यासह अन्य अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
"आपला पक्ष सर्व जाती, धर्म, शोषित व वंचित घटकांमध्ये एकता आणण्यासाठी कार्यरत आहे. आम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाच्या वतीने स्वबळावर लढवणार आहोत. यापुढे आम्ही 'रीमायंडर' म्हणून नव्हे तर 'कमांडर' म्हणून कार्य करू.".
- जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक - आरपीआय (आठवले), रायगड
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्रासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि रिपब्लिकन पक्ष तुमच्यासोबत ताकदीने उभा राहील,"
- जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड - आरपीआय (आठवले), रायगड
"सत्ते सोबतच आपल्या हातात पदे देखील असली पाहिजेत त्यासोबतच सर्वसामान्यांची कामे झाली पाहिजेत तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ आली तर रस्त्यावर उतरण्याची जबाबदारी ही आपली सर्वांची असली पाहिजे."
- अध्यक्ष प्रकाश मोरे - आरपीआय (आठवले), कोकण प्रदेश
कोणत्याही टिप्पण्या नाहीत