HEADLINE

Breaking News

शिक्षक क्षमता वृद्धी 2.0 तालुका स्तरीय प्रशिक्षण सुरु.




आंनद मनवर 

रायगड प्रतिनिधी 


पाली  - दि 17 रोजी शिक्षक  क्षमता वृद्धी 2.0 सुधागड तालुका स्तरीय  इयत्ता 1 ते 12 पर्यंत पहिल्या टप्प्याला आज गटशिक्षणाधिकारी मा. बांगारे  साहेब यांचा उपस्थितीत सुरवात झाले. या प्रशिक्षणास तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्तित होते. सदर प्रशिक्षण सर्व परीक्षेचा विचार करुन नियोजन बद्ध रित्या पार पाडण्यासाठी मा. बांगारे साहेब, यांचा मार्गदर्शना खाली शिक्षण विभागातील श्री. तुरे सर यांनी नियोजन केले आहे. सदर प्रशिक्षणाचा पाहिला टप्पा 17 ते 22 फेब्रुवारी या दरम्यान होत असुन दुसरा टप्पा दिनांक 24 ते 1 मार्च असा होणार आहे. सदर प्रशिक्षण येणाऱ्या काळात अतिशय महत्वाचे  आहे. आणि त्याचे महत्व गटशिक्षणाधिकारी श्री. बांगारे साहेबांनी मार्गदर्शन पर शब्दात सांगितले. सदर प्रशिक्षणास उपलब्ध असलेले माध्यमिक विभागात श्री, काटकर सर, श्री. नागठाणे सर, श्री. गिते सर, सौ. मराठे मॅडम व जिल्हा आदर्श शिक्षक भिलारे सर, तसेच आनंदा पाटील व इतर 8 तज्ज्ञ मार्गदर्शक हेही उत्तम रित्या अनुभवातून शिक्षकांना उत्तम प्रशिक्षण देत आहेत. सदर प्रशिक्षण भविष्यात येणाऱ्या सगळ्या गोष्टीचे सर्वकश मार्गदर्शन असल्या कारणाने उत्तम असल्याचे सर्व शिक्षक, शिक्षिका यांचा मध्ये चर्चा आहे









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत